अंकुश चौधरीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सध्या करतेय 'या' हिंदी मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 06:13 PM2021-07-13T18:13:12+5:302021-07-13T18:13:43+5:30

फार कमी लोकांना माहित असेल की अंकुशची पत्नीदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.

Ankush Chaudhary's wife is also a famous actress, currently working in 'Yaa' Hindi series | अंकुश चौधरीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सध्या करतेय 'या' हिंदी मालिकेत काम

अंकुश चौधरीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सध्या करतेय 'या' हिंदी मालिकेत काम

Next

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अंकुश त्याच्या पर्सनल लाइफबद्दल फारसा बोलताना कधी दिसत नाही. फार कमी लोकांना माहित असेल की अंकुशची पत्नी दिपा परब-चौधरी ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दीपाने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ती स्टार प्लस वाहिनीवरील मालिका शौर्य और अनोखी की कहानीमध्ये पहायला मिळते आहे.


दिग्दर्शक केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. तसेच तिने 'थोडी ख़ुशी थोडा गम', 'छोटी मॉ', 'मित' आणि 'रेत' यासारख्या हिंदी मालिकेतही काम केले आहे.

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दिपाने अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील मालिका शौर्य और अनोखी की कहानीमध्ये सध्या ती काम करताना दिसते.

तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केल्यापासून ती सोशल मीडियावरही सक्रीय झाली आहे. ती तिचे मालिकेतील फोटो बऱ्याचदा शेअर करताना दिसते. तिच्या या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. 


अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले आणि त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. दिपा लग्नानंतर फारच कमी चित्रपटात पाहायला मिळाली. शेवटची ती अंड्याचा फंडा या सिनेमात पहायला मिळाली होती.

तर अंकुशच्या आगामी वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो लवकरच लकडाउन या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Ankush Chaudhary's wife is also a famous actress, currently working in 'Yaa' Hindi series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app