अमृता खानविलकरचा नो- मेकअप लूक होतोय व्हायरल, चाहतेही देतायेत अशा प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 10:21 AM2020-06-09T10:21:56+5:302020-06-09T10:24:54+5:30

ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात. अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नोमेकअप लूकची स्तुतीच केली आहे.

Amrita Khanwilkar's no-makeup look is going viral, fans are also reacting | अमृता खानविलकरचा नो- मेकअप लूक होतोय व्हायरल, चाहतेही देतायेत अशा प्रतिक्रीया

अमृता खानविलकरचा नो- मेकअप लूक होतोय व्हायरल, चाहतेही देतायेत अशा प्रतिक्रीया

googlenewsNext

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपले सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली अमृता आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच अमृताने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

या फोटोत तिने अजिबात मेकअप केलेला नाही. तिचा हा विनामेकअप लूक पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. मेकअपमध्ये अमृता सा-यांच्या काळजाचा ठोका चुकवत असली तरी तिचा हा विनामेकअप लूकही सा-यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला चाहते पंसती देतात. अगदी त्याचप्रमाणे तिच्या या नोमेकअप लूकची स्तुतीच केली आहे.

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास अमृताच्सा या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.शिवाय बॉलीवुडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अमृता फिटनेसवर बरंच लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत इतरांनाही प्रेरणा देत असते. 

Web Title: Amrita Khanwilkar's no-makeup look is going viral, fans are also reacting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.