‘आलिया भोगासी- असावे सादर..!’, प्राजक्ता माळीने लॉकडाउनच्या निमित्ताने चाहत्यांना केले हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:11 PM2021-04-15T16:11:38+5:302021-04-15T16:12:08+5:30

प्राजक्ता माळीने नुकतेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना लॉकडाउनमध्ये घरी राहण्याचे आवाहन केले आहे.

‘Alia Bhogasi- Asave Saadar ..’, Prajakta Mali appeals to fans about lockdown | ‘आलिया भोगासी- असावे सादर..!’, प्राजक्ता माळीने लॉकडाउनच्या निमित्ताने चाहत्यांना केले हे आवाहन

‘आलिया भोगासी- असावे सादर..!’, प्राजक्ता माळीने लॉकडाउनच्या निमित्ताने चाहत्यांना केले हे आवाहन

googlenewsNext

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकतेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना लॉकडाउनमध्ये घरी राहण्याचे आवाहन केले आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर करत लिहिले की, तुकाराम महाराज सांगतात... ‘आलिया भोगासी- असावे सादर..’ .
तेव्हा ही सक्तीची सुट्टी चिंतेत नाही, चिंतनात घालवूया.. थोडक्यात सत्कारणी लावूया...निदान प्रयत्न तरी करूया.


प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना कोरोनाच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये घरी राहण्याचे आवाहन केले आहे. प्राजक्ताच्या या मेसेजसोबत तिच्या फोटोला खूप लाइक्स मिळत आहेत. तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या.


प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

Web Title: ‘Alia Bhogasi- Asave Saadar ..’, Prajakta Mali appeals to fans about lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.