Actress Sanskriti balgude did a photoshoot in her mother's saree | आईच्या साडीत मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केलं खास फोटोशूट, म्हणाली- ही तीचं प्रेम असावं..!!

आईच्या साडीत मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केलं खास फोटोशूट, म्हणाली- ही तीचं प्रेम असावं..!!

 सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने संस्कृती बालगुडे रसिकांवर मोहिनी घातली आहे. 'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.

संस्कृती चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहेत तिचं फोटोशूट. तिच्या या फोटोंमधील अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र यावेळी तिने साडीतले फोटोशूट करुन सगळ्यांनाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे संस्कृतीने आईची साडी परिधान करुन फोटोशूट केले आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे. फोटोमध्ये वेगवेगळ्या पोजेस देताना दिसतेय. आई ची साडी”.... कदाचित त्यात ही तीचं प्रेम असावं असं फोटो कॅप्शन संस्कृतीने या फोटोला दिले आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी केला आहे. 

संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी काळात भारंभार सिनेमा स्वीकारायचे नसून सिलेक्टिव्ह राहण्याचा संस्कृतीने निर्धार केला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Sanskriti balgude did a photoshoot in her mother's saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.