बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ. वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे.

बिग बॉस मराठी या रिएलिटी शोनंतर आता हिना आणखीन एका रिएलिटी शोमध्ये सध्या पहायला मिळते आहे. या शोचं नाव आहे मुझसे शादी करोगी.

हा शो कलर्स या हिंदी वाहिनीवर नुकताच दाखल झाला आहे. हा शो स्वयंवर आधारीत असून या शोमध्ये शहनाज गिल व पारस छाब्रासाठी जीवनसाथी निवडला जाणार आहे.


हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे.

 

पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची 'Look-Alike' म्हणून हिना ओळखली जाते.


हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत.

यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

Web Title: This actress from Marathi Cineindustry gives Malaika Arora a collision in boldness, looking at the photo and says ... Babo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.