Actress Kranti Redkar looks More Beautiful In Red Colour Saree | लाल रंगाच्या साडीत खुललं क्रांती रेडकरचे सौंदर्य, लवकरच देणार 'गुड न्यूज'

लाल रंगाच्या साडीत खुललं क्रांती रेडकरचे सौंदर्य, लवकरच देणार 'गुड न्यूज'

क्रांतीने आतापर्यंत अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलीय. क्रांतीच्या नावावर बरेच मराठी सिनेमे आहेत पण त्यात प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेले सिनेमे म्हणजे जत्रा,फक्त लढ म्हणा, शिक्षणाच्या आयचा घो,पिपाणी आणि नुकताच येउन गेलेला नो एन्ट्री पुढे धोका आहे..यांसारख्या सिनेमातून आपण तिला पाहलियं...पण क्रांती इथवरच थांबली नाहीतर हिंदीतही हम भी किसीसे कम नही असल्याचं तिन सिधिद केलंय....हिंदीला गंगाजल या सिनेमातून क्रांतीनं तिची अभिनयाची जादू दाखवून दिली..मराठी तसं बघायला गेलं तर हिंदीप्रमाणे ग्लँमरस अभिनेत्री तशा कमीच पाहयला मिळतात.याला देखील क्रांती अपवाद ठरलीय. ग्लॅमरस लुकनं तिनं रसिकांना घायाळ केलं. अभिनयाच्या विविध छटा साकारणारी क्रांती आता लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहे.

लाल रंगाच्या साडीत क्रांती अतिशय सुंदर दिसत आहे. साजेसा मेकअप, केसांचा पाडलेला अंबाडा आणि कानात मोठे इअररिंग्स मध्ये क्रांती फारच सुंदर दिसत आहे. तिचे साडीतील हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.

त्याच बरोबर तिने साडीतील हे फोटो शेअर करुन क्रांतीने Shot for something really exciting and enriching .. will update soon म्हणत आपला आनंदही व्यक्त केला आहे. आता क्रांती नेमकं काय करणार आहे. हे तर योग्य वेळ आल्यावरच कळेल. त्यामुळे क्रांतीची 'गुड न्यूज' जाणून घेण्यासाठी चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार हे मात्र नक्की. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Kranti Redkar looks More Beautiful In Red Colour Saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.