मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. 


मात्र सध्याची नव्या कलाकारांचीवेलणकरचा पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे रेगे, घंटा अशा सिनेमातून रसिकांची मने जिंकणारा अभिनेता आरोह वेलणकरचा हा फोटो. बदललेला लूक. रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल आणि दाढी यामुळे विनोद सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे. 


हा फोटो पाहून फिटनेसबाबत  आरोह अधिक सजग असल्याचे समजते. आरोहची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले आहे. कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करत असल्याचे या फोटोंवरून स्पष्ट होते.


मैत्रिण अंकिता शिंगवी हिच्यासह त्याने लग्न करत आपला संसार थाटला आहे. नेहमीच सोशल मीडियावर आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांच्या फोटोंना चाहतेदेखील  तुफान पंसती देत असतात. तुर्तास आरोहचा हा फोटो पाहून तरूणीं मात्र फुल ऑन त्याच्यावर लट्टु झाल्या आहेत.

 

Web Title: Actors Aroh Velankar have a perfect six pack Abs- SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.