मुलगी झाली हो...अक्षय वाघमारेच्या घरी अवतरली 'नन्ही परी', अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 05:54 PM2021-05-07T17:54:29+5:302021-05-07T18:05:21+5:30

अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Actor Akshay waghmare blessed with baby girl | मुलगी झाली हो...अक्षय वाघमारेच्या घरी अवतरली 'नन्ही परी', अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

मुलगी झाली हो...अक्षय वाघमारेच्या घरी अवतरली 'नन्ही परी', अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

Next

बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारे बाबा झाला आहे. अक्षयची पत्नी योगिता गवळी कन्यारत्नला जन्म दिला आहे. अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. चाहते अक्षय आणि योगितावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.    योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळीची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत. 

अक्षयने चाहत्यांसोबत तो बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती.  A grand adventure is about to begin, Waiting for our new edition...❤️ अशा कॅप्शनसह अक्षयने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.  ​8 मे 2020 रोजी अक्षय व योगिता यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला होता. 

अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान कुटुंबीयांनी दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप या मराठी चित्रपटांत काम केले आहे. ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमात अक्षयने सरदार कोयाजी नाईक बांदल यांची भूमिका साकारली होती. योगिता ही एक एनजीओ चालवते. या माध्यामातून महिलांच्या आरोग्यासाठी ती काम करते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Akshay waghmare blessed with baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app