Actor Aashutosh Bhakre, husband of actress Mayuri Deshmukh, dies by suicide | डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, मयुरी देशमुखचा पती आशुतोष गेल्या काही दिवसांपासून होता तणावात

डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, मयुरी देशमुखचा पती आशुतोष गेल्या काही दिवसांपासून होता तणावात

ठळक मुद्देमयुरी व आशुतोषचे तसे अरेंज मॅरेज होते. एका कौटुंबिक पार्टीत घरच्यांनी तिची व आशुतोषची भेट घालून दिली होती.

मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने काल नांदेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. 32 वर्षांच्या आशुतोषच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, आशुतोष गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. डिप्रेशनमुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
आयुतोषच्या अकाली जाण्याने त्याची पत्नी मयुरी आणि कुटुंबीय धक्क्यात आहेत. काल दुपारी आशुतोषचे आईवडिल त्याच्या फ्लॅटमध्ये गेले असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.

आशुतोषने भाकर आणि इचार ठरला पक्का या सिनेमांत काम केले आहे. 2006 साली त्याने मयुरीसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांचाही संसार सुखात सुरु होता. लॉकडाऊनदरम्यान तो मयुरीसोबत नांदेडच्या घरातच राहत होता.

मयुरी व आशुतोषचे तसे अरेंज मॅरेज होते. एका कौटुंबिक पार्टीत घरच्यांनी तिची व आशुतोषची भेट घालून दिली होती. यानंतर मयुरी व आशुतोष पुन्हा एकदा भेटले आणि या भेटीत आशुतोषने मयुरीला लग्नासाठी विचारले होते. पुढे दोघांचेही लग्न झाले.
गेल्या 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांच्या मते सुशांत 2019 पासून डिप्रेशनमध्ये होता. मुंबईच्या डॉक्टरांकडून तो उपचार घेत होता. अर्थात त्याचे वडिल के के सिंग यांनी याप्रकरणी बिहार पोलिसांत सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Aashutosh Bhakre, husband of actress Mayuri Deshmukh, dies by suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.