'ती सध्या काय करते' या सिनेमातून अभिनय बेर्डे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.या सिनेमातील अभिनयच्या भूमिकेचे आणि त्याच्या अभिनय कौशल्याचे सा-यांकडूनच कौतुक झालं होते. या सिनेमासाठी अभिनयचा गौरवही करण्यात आला होता. अल्पावधीतच अभिनयने रसिकांची मनं जिंकली आहेत. आता अभिनय पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी तो मराठी सिनेमातून नाही तर थेट बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. याविषयी अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अभिनयच्या एका पोस्टवरुन तो 'आदिपुरुष' सिनेमात झळकणार असल्याचे समजतंय.

या चर्चेला कारणीभूत ठरली ती अभियची सोशल मीडियावरची एक पोस्ट. अभिनयने त्याचा एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला 'आरंभ' अशी कॅप्शन दिली. या कॅप्शनमुळे तो 'आदिपुरुष' सिनेमात झळकणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

दिग्दर्शक ओम राऊत ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाच्या यशानंतर आता 'आदिपुरुष' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. २०२२ मध्ये हा सिनेमात हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये भगवान रामाची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीत ओम राऊतने सांगितले होते की, जेव्हा त्याने या सिनेमात भगवान रामच्या भूमिकेबाबत विचार केला तेव्हा त्याच्यासमोर केवळ आणि केवळ प्रभासचा चेहरा आला होता. रामाची भूमिका प्रभासपेक्षा चांगली दुसरं कुणी करू शकणार नाही.

अखेर चर्चा खरी ठरली! ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकेशची भूमिका

ओम राऊत यांच्या तान्हाजी सिनेमात सैफ अली खानने उदयभानची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा लंकेशच्या भूमिकेतून सैफ अली खान ‘आदिपुरुष’मध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. याबाबत सैफ अली खानने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला की, मला पुन्हा ओमी दादांसोबत काम करण्यात आनंद वाटतोय, त्याच्याकडे उत्कृष्ट दृष्टीकोन आणि तांत्रिक ज्ञानाची प्रचंड माहिती आहे. मी या प्रोजेक्टचा भाग असल्याने आनंदित आहे. मी प्रभाससोबत सिनेमात काम करण्यास आणि राक्षसी भूमिका साकारण्यास उत्सुक आहे असं त्याने सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abhinay Berde to work with Om Raut and Prabhas in 'Adipurush'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.