'Aanandi Gopal' expecting audience for Oscars | 'आनंदी गोपाळ'कडून प्रेक्षकांना ऑस्करवारीची अपेक्षा'

'आनंदी गोपाळ'कडून प्रेक्षकांना ऑस्करवारीची अपेक्षा'

ठळक मुद्दे'आनंदी गोपाळ' ह्या ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली.

'आनंदी गोपाळ' ह्या ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही जोडपी अशी असतात, जी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडतात आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन पाऊलवाट मोकळी करून देतात. 'आनंदी' आणि 'गोपाळ' असंच एक जोडपं. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित समीर विद्वांस दिग्दर्शित ह्या ध्येयवेड्या जोडप्याचा जीवनप्रवास इतिहासाच्या सोनेरी पानांवरुन रुपेरी पडद्यावर झी स्टुडिओज् च्या माध्यमातून उलगडला आणि त्यावर प्रेक्षकांनी पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली.प्रेक्षागृहातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल नेटवर्क साइट्सवरूनही ललित ,भाग्यश्री आणि इतर कलाकारांच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सिनेमाचा विषय, त्याची कथा, त्याची मांडणी, त्यातील कलाकारांचा उत्तम अभिनय, संगीत, समोर कॅमेरातून दिसणारी मोहक दृश्य आणि या सगळ्याच्या सोबतीला अतिशय सहज आणि मनाला भिडणारे संवाद तसंच छोटी छोटी, अतिशय मार्मिक, प्रतिकात्मक दृश्य, यामुळे सिनेमा शेवटपर्यंत उत्कंठावर्धक होणे असो वा असामान्य जोडप्याची असामान्य गोष्ट आमच्यासमोर मांडल्याबद्दल आभार मानणे असो, सिनेमा फक्त त्या दोघांबद्दलची माहिती आणि त्यांच्या खडतर आयुष्याबद्दल सांगत नाही तर एखाद्या अवघड परिस्थितीमधून सुद्धा एखादं स्वप्न आणि ते सुद्धा समाज हिताचं, पूर्ण करण्यासाठी काय प्रकारची स्वयंप्रेरणा असावी लागते हे दाखवून देतो. अशा प्रकारच्या अतिशय भावूक प्रतिक्रिया आणि चित्रपटाबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. विशेषतः या सर्वांमध्ये तरूण आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसतोय. बहुतांश प्रेक्षकांनी तर हा चित्रपट भारताकडून ऑस्करवारी घडवेल अशी आशा असून यातच चित्रपटाचे यश सामावले आहे.   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Aanandi Gopal' expecting audience for Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.