"आनंद दिघे साहेबांना भेटण्याचं भाग्य दोनदा लाभलं..," ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:13 PM2022-05-13T16:13:42+5:302022-05-13T16:14:39+5:30

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्तानं मिलिंद गवळी यांनी शेअर केली विशेष पोस्ट.

aai kuthe kai karte actor milind gawali aka aniruddha shares his memory with shiv sena anand dighe dharmaveer movie release | "आनंद दिघे साहेबांना भेटण्याचं भाग्य दोनदा लाभलं..," ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने दिला आठवणींना उजाळा

"आनंद दिघे साहेबांना भेटण्याचं भाग्य दोनदा लाभलं..," ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने दिला आठवणींना उजाळा

Next

शिवसेनेचे नेते आणि ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान, आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी आनंद दिघे यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी मांडला आहे. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक यानं साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मिलिंद गवळी यानं प्रसाद ओकसाठी एक विशेष पोस्ट लिहिली आहे.


“प्रसाद ओक तुझं खूप खूप कौतुक, तुझं खूप खूप अभिनंदन, वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपण दोघांनी केलेल्या ‘अथांग’ नावाच्या सिरीयल पासून ते आत्ता धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या भूमिकेपर्यंतचा तुझा प्रवास मी पाहिला आहे. खूपच कौतुकास्पद, यशस्वी आहे तो, very inspiring as well. आपला मित्र इतकं कसं छान काम करतो, याचा अभिमान वाटतो. दिग्दर्शन असो किंवा अभिनय असो तू अप्रतिमच काम करतोस. मागच्या आठवड्यात चंद्रमुखी पाहिला, इतका अप्रतिम सिनेमा फार दिवसात बघितला नव्हता आणि आता तर काय धर्मवीर सिनेमा उद्या रिलीज होतोय, पण तो रिलीज व्हायच्या आधीच सुपर-डुपर हिट झालाय असं तू समजच, कारण आनंद दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं होतं,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.  

“आपल्या समाजामध्ये हिरो कोणाला म्हणावं, आदर्श कोणाला मानावं तर आनंद दिघे साहेब हे उत्तम उदाहरण आहेत आणि तू हुबेहूब आनंद दिघे साहेबांचा सारखा दिसला आहेस ( Actor Ben Kingsley Gandhi film दिसला तसा). तुझ्या अभिनयाची उंची मला माहिती आहे. त्यामुळे सिनेमा अप्रतिमच असणारच, खूप खूप खूप शुभेच्छा मित्रा. माझे मित्र प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई तुमचा सुद्धा खूप अभिमान वाटतो, हा विषय निवडला आणि त्याला तुम्ही न्याय दिलात. धर्मवीर च्या संपूर्ण टीमला माझा सलाम आणि शुभेच्छा,” असंही त्यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे. त्यांनी यासोबत आनंद दिघे यांच्यासोबतच्या फोटोसह चित्रपटाचा ट्रेलरही शेअर केला आहे.

Web Title: aai kuthe kai karte actor milind gawali aka aniruddha shares his memory with shiv sena anand dighe dharmaveer movie release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app