​आमिर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'चा ७००वा प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 05:02 AM2018-05-17T05:02:17+5:302018-05-17T10:32:17+5:30

शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ...

700th experiment of 'Shivaji Underground in Bhimnagar Mohalla' to be played in the presence of Aamir Khan, Nagaraj! | ​आमिर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'चा ७००वा प्रयोग!

​आमिर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'चा ७००वा प्रयोग!

googlenewsNext
हिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव  नाट्यगृह माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत.
सारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांनी हा प्रयोग आयोजित केला आहे. "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" हे नाटक २०१२ मध्ये रंगभूमीवर आले होते. त्यानंतरच्या सहा वर्षांत या नाटकाने ७०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन नंदू माधव यांनी केले आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत. नाटकाची संकल्पना, गीत, संगीत शाहीर संभाजी भगत यांचे आहे. या नाटकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून कशा पद्धतीने राजकारण केले जाते, या स्फोटक विषयावर अतिशय संयत आणि विचारपूर्वक भाष्य केले आहे. 
'कोणत्याही नाटकाचे ७०० प्रयोग होणे ही आनंदाची घटना आहे. आमच्या टीमने केलेल्या कष्टांची ही परिणिती आहे. या ७०० व्या प्रयोगाला आमिर खान आणि नागराज मंजुळे यांच्यासारखे संवेदनशील कलाकार उपस्थित राहणार आहेत, याचा विशेष आनंद आहे,' असे निर्माता भगवान मेदनकर यांनी सांगितले.
“शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकाबद्दल एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, हे नाटक खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा,धर्माचा, समाजाचा किवा प्रांताचा नसून ते कष्टकर्त्याचा, पिडितांचा आणि शोषितांचा आणि यासोबतच माणूस म्हणून माणसाप्रमाणे जगणाऱ्याचा   होता. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात तो जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते.

Also Read : झुंड या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यापूर्वीच नागराज मंजुळे यांना बसला हा धक्का

Web Title: 700th experiment of 'Shivaji Underground in Bhimnagar Mohalla' to be played in the presence of Aamir Khan, Nagaraj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.