आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:49 IST2024-03-28T13:47:11+5:302024-03-28T13:49:56+5:30
"'तो' शब्द जर शिंदे साहेबांनी दिला नसता, तर आम्ही तीकडे पाऊलही टाकले नसते. आमचे लक्ष पूर्ण करायचे होते..."

आपण गुवाहाटीला का गेलो? युतीसोबत का आहोत? नवनीत राणांसंदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी सगळंच सांगितलं!
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणूनही घोषित केले आहे. मात्र, बच्चू कडू त्यांना कडाडून विरोध करत आहेत. यामुळे नवनीत यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यातच, रविराणा यांनी नुकतेच बच्चू कडू यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांना, अमरावतीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. यानंतर आता बच्चू कडू यांनी रवी राणांनाही लक्ष्य केले. याचवेळी त्यांनी गुवाहाटीला जाण्यामागचे कारणही सांगितले.
रवी राणा यांच्या आवाहनावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "घरात घुसून मारण्याची भाषा, कुठेही जाता तर पैसेच खाऊन जातात, आता दाखवू ना पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिक पणात? म्हणजे खोके घेतल्या शिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही... अरे असं असंत तर आम्ही कधीच आमचं चित्र पालटलं असतं. तुमच्या सारखं स्वाभिमानी पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधला नसता. तुमचे राजकारण आहे, तुमचा प्रकार आहे. इमानदारीने राहू आणि इमानदारीने काम करू." कडू टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते.
गुवाहाटीला जाण्यासंदर्भात काय म्हणाले बच्चू कडू? -
"जे काही आम्ही गुवाहाटीला गेलो असू, दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला होता म्हणून गेला होता बच्चू कडू. तो शब्द जर शिंदे साहेबांनी दिला नसता, तर आम्ही तीकडे पाऊलही टाकले नसते. आमचे लक्ष पूर्ण करायचे होते. आम्ही ज्या दिव्यांगांसाठी लढत होतो, त्या दिव्यांगांचे स्वप्न, तो क्षण त्यांच्या समोर आणायचा होता. 15 ते 25 वर्षांचे आंदोलन यशस्वी झाले. शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय दिले. खरे तर शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय दिले, म्हणून आम्ही युतीच्या सोबत आहोत. नाही तर दुसरे काही कारण नाही. तर आमच्या मतदार संघ्यात हा खोके घेणारा आमदार नाही, तर दणके देणार आमदार आहे, हे दाखवून देऊ." असेही कडू यांनी म्हटले आहे.
...तर नवनीत राणा यांना पाडणे महत्वाचे -
आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत. तसेच, बच्चू कडू यांनीही, सर्वच मोठ्या नेत्यांनी एकत्रित होऊन या निवडणुकीकडे बघायला हवे. आपल्या पेक्षाही ज्याला पाडायचे आहे, ते टार्गेट लक्षात घेऊन समोर जायला हवे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार निवडून येतो हे महत्वाचे नाही, तर नवनीत राणा यांना पाडणे महत्वाचे आहे, असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी