"ठाकरे भाई अब घर पर रहें, वर्क फ्रॉम...!"; BMC निवडणूक निकालावर शिंदे सेनेचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:42 IST2026-01-16T18:38:52+5:302026-01-16T18:42:01+5:30

Municipal Election : शिवसेना नेत्या म्हणाल्या, "उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पटकथालेखक (स्क्रिप्ट रायटर) बदलायला हवा आणि नवी कारणे शोधायला हवीत. जनता विजय आणि पराभव ठरवते. संदेश असा आहे की जमिनीवर काम करणाऱ्यांना संधी मिळते. घरून काम करणाऱ्यांना घरीच राहावे लागते."

Shiv sena leader shaina nc commented on uddhav thackeray thackeray | "ठाकरे भाई अब घर पर रहें, वर्क फ्रॉम...!"; BMC निवडणूक निकालावर शिंदे सेनेचा निशाणा

"ठाकरे भाई अब घर पर रहें, वर्क फ्रॉम...!"; BMC निवडणूक निकालावर शिंदे सेनेचा निशाणा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) 227 वार्डांची मतगणना सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार, बीएमसीमध्ये भाजपा महायुती 118 जागांवर आघाडीवर दिसत आहेत. तर ठाकरे बंधू 69 जागांवर आघाडीवर दिसत आहेत. तसेच, काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर दिसत आहे. यातच शिंदेसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी विरोधी पक्षांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करत ठाकरेंनाही स्क्रिप्ट बदलण्याचा सल्ला दिला आहे.

शिवसेना नेत्या म्हणाल्या, "उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पटकथालेखक (स्क्रिप्ट रायटर) बदलायला हवा आणि नवी कारणे शोधायला हवीत. जनता विजय आणि पराभव ठरवते. संदेश असा आहे की जमिनीवर काम करणाऱ्यांना संधी मिळते. घरून काम करणाऱ्यांना घरीच राहावे लागते." त्यांनी राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आणि उद्धव सेना राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.

ठाकरे बंधूंवर टीका करताना शायना एनसी म्हणाल्या, "त्यांनी २५ वर्षांत काहीही केले नाही. पण आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन टप्प्यांत खड्ड्यांचा प्रश्न सोडवला. त्यांनी २६ भ्रष्ट कंत्राटदारांना तुरुंगात पाठवले. मागील सरकार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही देऊ शकले नाही. आम्ही ७ दिले. विकासाच्या बाबतीत, आम्ही ५,००० इलेक्ट्रिक बसेस, ४३५ किमी मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत." एवढेच नाही तर, बीएमसी निवडणुकीसाठी युती करणाऱ्या ठाकरे बंधूंनी घरून काम करावे आणि घरीच राहावे, असेही त्या म्हणाल्या.

शायना एनसी पुढे म्हणाल्या, ज्यांना वाटते, घरून काम करता येते, त्यांच्यासाठी हा काळ राजकारण आणि कामगिरी करण्याचा आहे, केवळ आडनावांवरून मते मिळवण्याचा नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे सामान्य लोकांसाठी समर्पित राहिले आणि त्यांच्यासाठी काम केले, ज्यामुळे त्यांचा विश्वास निर्माण झाला. 

Web Title: Shiv sena leader shaina nc commented on uddhav thackeray thackeray