सांगलीत विशाल पाटलांकडून उमेदवारी अर्ज; संजय राऊत म्हणाले, “...तर पक्षाने कारवाई करावी”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:54 PM2024-04-17T12:54:51+5:302024-04-17T12:55:09+5:30

Sanjay Raut News: काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना गेल्या १० वर्षांत भाजपाचे आमदार, खासदार निवडून येत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

sanjay raut reaction over congress vishal patil files nomination for sangli lok sabha election 2024 | सांगलीत विशाल पाटलांकडून उमेदवारी अर्ज; संजय राऊत म्हणाले, “...तर पक्षाने कारवाई करावी”

सांगलीत विशाल पाटलांकडून उमेदवारी अर्ज; संजय राऊत म्हणाले, “...तर पक्षाने कारवाई करावी”

Sanjay Raut News: काँग्रेस अपक्ष आहे का, ते मला माहिती नाही. जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरोधात काम करत असेल, तर त्या पक्षाने त्यावर कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरोधात भूमिका घेत असेल आणि महाविकास आघाडीच्या पक्षातील लोक त्याच्यासोबत उभी राहत असतील, तर मला असे वाटते की, पक्षात जी शिस्तभंगाची भूमिका असते, ती घ्यायला हवी. त्या सगळ्यांची हकालपट्टी करायला हवी. मग पक्ष कोणताही असो. कोणत्याही पक्षाचे नाव घेत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

सांगलीत ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तरीही या जागेसाठी काँग्रेस अद्यापही आग्रही आहे. ठाकरे गटाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे. या घडामोडींमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही. विशाल पाटील यांनी एक काँग्रेस व एक अपक्ष असे दोन फॉर्म भरले. यावरून संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना कोणी बंडखोरी करत असेल तर पक्षाने कारवाई करावी, असे सुचवले.

भाजपाला टक्कर द्यायची असेल तर, शिवसेनाच उभी राहायला हवी

कुणाच्या पक्षाची किती ताकद आहे, हे लोक ठरवतील. त्याच सांगलीत गेल्या १० वर्षांपासून भाजपाचे आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना, मोक्याच्या ठिकाणी भाजपा किंवा संघ परिवाराचे लोक निवडून येतात. असे असेल तर याला त्या पक्षाची ताकद मानत नाही. भाजपाला टक्कर द्यायची असेल तर, शिवसेनाच उभी राहायला हवी, असे आमचे धोरण आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाहतो. रामटेकमध्ये आम्ही काम सुरू केले आहे. ओपिनियन पोल येत आहेत, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्रात १०० टक्के यश मिळवायच्या मार्गावर आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, त्यांना ४५ हून अधिक जागा मिळतील. पण देवेंद्र फडणवीस यांना आकडे लावायची सवय झाली आहे. निवडणुकांनंतर त्यांना त्याच धंद्यात पडावे लागेल. देशपातळीवरील इंडिया आघाडी ३०५ जागा जिंकेल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल, असा मोठा दावा संजय राऊतांनी केली. 
 

Web Title: sanjay raut reaction over congress vishal patil files nomination for sangli lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.