NCP takes nod on Uddhav Thackeray's visit Amit shahas rally's in gandhinagar | उद्धव ठाकरेंच्या गुजरातवारीवर राष्ट्रवादीकडून पोवाड्यातून खिल्ली 

उद्धव ठाकरेंच्या गुजरातवारीवर राष्ट्रवादीकडून पोवाड्यातून खिल्ली 

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्वाचे म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर शहा यांच्या रॅलीचे आणि फॉर्म भरतानाच्या व्हिडिओंना शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढल्याच्या पराक्रमावर रचलेला पोवाडा ऐकवत खिल्ली उडविली आहे. 


छत्रपती शिवरायांनी वाघ नखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. यावर एक प्रसिद्ध पोवाडा आहे. या पोवाड्याचा आधार या व्हिडिओमध्ये घेतला आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवर टाकण्यात आला आहे. 


गेली पाच वर्षे अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत दाखल झाले आहेत. हेच का शिवरायांचे मावळे असा सवाल विचारत उद्धव यांच्या शहाभेटीची खिल्ली उडविली आहे. तसेच अशा लोकांनी शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान 


असल्याचेही म्हटले आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रवादीने शिवसेना, उद्धव ठाकरेंनाही टॅग केले आहे. 
शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाला लक्ष्य केले होते. तसेच वेळोवेळी शहा यांचा अफजलखान असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी टीका केली होती.

Web Title: NCP takes nod on Uddhav Thackeray's visit Amit shahas rally's in gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.