राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील पंतप्रधान मोदींच्या मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 10:24 AM2019-04-17T10:24:38+5:302019-04-17T10:26:32+5:30

राधाकृष्ण विखे पाटलांनी या सभेला मंचावर हजर राहण्याचे टाळले होते.

NCP MP Vijay Singh Mohite - Patil on the platform of Prime Minister Modi | राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील पंतप्रधान मोदींच्या मंचावर

राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील पंतप्रधान मोदींच्या मंचावर

Next

सोलापूर : भाजपा-राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केलेल्या माढा मतदारसंघामध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. भाजपाच्या सभेच्या या मंचावर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांनी उघडपणे उपस्थिती लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


अकलूज येथील सभेत खासदार विजयसिंह मोहिते-  पाटील, सुधाकरपंत परिचारक, आमदार निलम गोरे, कांचन कुल, आ. प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-  पाटील,  चंद्रकांत पाटील, शहाजी पवार, उत्तमराव जानकर आदींची उपस्थिती आहे. तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आ. नारायण पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे शिवाजी सावंत व्यासपीठावर दाखल झाले आहेत. 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखीही अकलूजमध्ये आलेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख दाखल झाले आहेत. 


काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मोदींनी नुकतीच सभा घेतली होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटलांनी या सभेला मंचावर हजर राहण्याचे टाळले होते. विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते - पाटील हे उघडपणे मोदींच्या सभेला उपस्थित राहिले आहेत. 

Web Title: NCP MP Vijay Singh Mohite - Patil on the platform of Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.