Mayor Reservation: महापौर आरक्षण: मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:47 IST2026-01-22T12:44:08+5:302026-01-22T12:47:18+5:30

Open Reservation Mayor Municipal List: महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत २०२६: मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिकसह १७ शहरांत खुला प्रवर्ग. कोणाची लागणार वर्णी? वाचा सविस्तर.

Mayor Reservation 2026 For Open : Mayoral reservation: 'Open category' in major cities including Mumbai, Pune, Sambhajinagar; Which municipal corporation is open for women... | Mayor Reservation: महापौर आरक्षण: मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग'

Mayor Reservation: महापौर आरक्षण: मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग'

मुंबई: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण आज (२२ जानेवारी २०२६) जाहीर झाले. यामध्ये राज्यातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या शहरांचे महापौरपद खुला प्रवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील बलाढ्य आणि दिग्गज नेत्यांना आता महापौरपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळणार आहे.

खुला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली प्रमुख शहरे:

महानगरे: मुंबई(महिला), नवी मुंबई, पुणे (महिला), छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड (महिला).

इतर शहरे: अमरावती, भिवंडी (महिला), वसई-विरार, मीरा भाईंदर, मालेगाव, परभणी, सोलापूर, नांदेड, धुळे (महिला), सांगली.

या निकालाचे राजकीय महत्त्व:

खुला प्रवर्ग असल्याने आता जातीचे कोणतेही बंधन उरलेले नाही. परिणामी, मुंबईत भाजप-शिंदे युती आणि पुण्यात महायुतीमधील 'हेवीवेट' नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत भाजपने मोठे यश मिळवले आहे, तर ठाकरे गटानेही चिवट झुंज दिली आहे. आता खुला प्रवर्ग निघाल्याने येथे कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

पुढील प्रक्रिया काय?
आजच्या आरक्षण सोडतीनंतर आता १५ दिवसांच्या आत महापौर निवडीसाठी विशेष सभा बोलावल्या जातील. ज्या शहरांत खुला प्रवर्ग (महिला) असे उप-आरक्षण पडले आहे, तिथे केवळ महिलांना संधी मिळेल, तर उर्वरित ठिकाणी चुरस अधिक असेल.

Web Title : मेयर आरक्षण: मुंबई, पुणे में 'महिला राज'; 17 शहरों में 'खुला वर्ग'

Web Summary : मुंबई, पुणे समेत कई शहरों के मेयर पद खुले वर्ग के लिए आरक्षित। इससे राजनीतिक दिग्गजों को मौका मिलेगा, जिससे प्रतिस्पर्धा तेज होगी। आगामी मेयर चुनाव का बेसब्री से इंतजार है, खासकर जहाँ 'खुला' वर्ग केवल महिलाओं पर लागू होता है।

Web Title : Mayoral Reservations: 'Women's Rule' in Mumbai, Pune; Open Category in 17 Cities

Web Summary : Mumbai, Pune, and other major cities' mayoral posts are open. This allows political heavyweights a chance, sparking intense competition. Upcoming mayoral elections are keenly anticipated, especially where the 'open' category applies to women only.