Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:13 IST2026-01-15T07:08:25+5:302026-01-15T09:13:54+5:30
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live: सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ ...

Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live: सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीचे मतदान गुरुवारी होत आहे. ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार हे १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू होईल आणि ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यत चालेल. मुंबई महापालिका कोणाची उद्धव व राज या ठाकरे बंधूंची की भाजप व शिंदेसेनेची तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका भाजपची की अजित पवार-शरद पवार या जोडीची याचा फैसला मतदार करणार आहेत. पाहा, या सर्व महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाचे Live Updates...
LIVE
15 Jan, 26 : 09:11 AM
नाशिक: मतदार याद्यांचा घोळ मतदान यंत्रात बिघाड सुरुवातीला संथ गतीने मतदान
महानगरपालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. मात्र, बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांची नावे सापडत नसल्यामुळे किंवा अगोदरच्या मतदान केंद्रा ऐवजी भलत्याच ठिकाणी दूरवरील केंद्रावर मतदाराची नाव असल्यामुळे गोंधळ असल्याचे चित्र आहेत.
काही मतदारांचे प्रभाग देखील बदलण्यात आले असून काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले आहेत कुटुंबातील बहुतांशी सदस्यांची फाटाफूट करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. अनेक मतदार त्यामुळे मतदान न करताच परत जात आहेत. दरम्यान शहरातील आनंदवली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएमचा बिघाड झाला तसेच सिडकोतील प्रभाग 25 मध्ये एका मतदान केंद्रावर चार पैकी एकच ईव्हीएम सुरू असल्यामुळे सुमारे तासभर मतदान ठप्प होते अखेरीस नवीन ईव्हीएम आणल्यानंतर मतदान सुरू झाले.
15 Jan, 26 : 09:10 AM
मुंबईत मतदानाला सुरुवात,मतदार केंद्रावर गर्दी किती?
15 Jan, 26 : 09:10 AM
मतदान सुरू होण्याआधी पुणेकरांच्या मतदान केंद्रावर रांगा; पुण्यात परिस्थिती काय? Live
15 Jan, 26 : 09:09 AM
Pune Live : EVM मशीन बाहेर का नेत आहात? प्रभाग २१ मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
15 Jan, 26 : 09:09 AM
कल्याण डोंबिवलीत काय आहे परिस्थिती?
15 Jan, 26 : 09:08 AM
खासदार संजय पाटील यांनी कुटुंबासह भांडुपच्या गीता हॉल येथे मतदानाचा हक्क बजावला

15 Jan, 26 : 09:06 AM
सोलापूर महानगरपालिकेतील २६ प्रभागातील १०२ नगरसेवकांसाठी मतदान सुरु; पहिल्या टप्प्यात मतदान यंत्र बंद पडल्याच्या अनेक तक्रारी
15 Jan, 26 : 09:06 AM
पुणे: संत नामदेव शाळा, प्रभाग क्रमांक २१, बूथ नंबर ७ मध्ये ही मशीनमध्ये एरर; प्रभाग २६ अभ्यासीका वसंत दादा ( घोरपड़े उद्यान) मतदान केंद्र मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया बंद
15 Jan, 26 : 09:05 AM
पुणे: प्रभाग क्रमांक २१ मध्ये, बूथ नंबर १ सिटी इंटरनॅशनल मशीनमध्ये एरर
15 Jan, 26 : 09:05 AM
पिंपरी महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशिन बंद, मोबाईल बंदीवरून वाद
15 Jan, 26 : 09:04 AM
जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात
जालना महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक पार पडत आहे. ६५ जागांसाठी दोन लाख ४५ हजार ९२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २९१ केंद्रांवर मतदान होत असून यासाठी ४२ पोलीस आधिकाऱ्यांसह १५०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान याठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी फाईट रंगणार आहे.
15 Jan, 26 : 09:01 AM
मुंबई: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनी बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | Mumbai: After casting her vote for the BMC elections, Actress Twinkle Khanna says, "I think it gives us a sense of control, a little bit of power over the narrative, and I am voting both out of habit and hope. " pic.twitter.com/ygl3FPi5XM
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:59 AM
केवळ चर्चा करण्यापेक्षा बाहेर पडून मतदान केले पाहिजे: अभिनेता अक्षय कुमार
मुंबई मनपा निवडणुकीबद्दल अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, बीएमसी निवडणूक आहे आणि मुंबईकर म्हणून, हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या हातात रिमोट कंट्रोल असतो. त्यामुळे, नंतर गोष्टी व्यवस्थित नाहीत म्हणून तक्रार करण्यापेक्षा, मुंबईतील सर्व लोकांनी बाहेर पडून मतदान केले पाहिजे. योग्य लोकांना निवडण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. जर तुम्हाला मुंबईचे खरे हिरो व्हायचे असेल, तर केवळ चर्चा करण्याऐवजी तुम्ही बाहेर पडून मतदान केले पाहिजे.
VIDEO | Mumbai: On BMC polls, actor Akshay Kumar says, “Today is the BMC election and, as Mumbaikars, this is the day when we have the remote control. Therefore, all the people of Mumbai must come out and vote, rather than complaining later about things not being in good shape.… pic.twitter.com/CibMsSkTsC
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:57 AM
स्थानिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, मतदान करण्याची संधी मिळणे हा एक मोठा सन्मान: चंद्रशेखरन
मुंबई मनपा निवडणुकीबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, मतदान करण्याची संधी मिळणे हा एक मोठा सन्मान आहे, आणि मी प्रत्येकाला आवाहन करतो व विनंती करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि मोठ्या संख्येने बाहेर पडावे. स्थानिक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि बीएमसी निवडणूक होत असल्याचा मला आनंद आहे. मी नवीन प्रशासनाच्या प्रतीक्षेत आहे.
VIDEO | Mumbai: On the BMC polls, Tata Chairperson Natarajan Chandrasekaran says, “It is a great privilege to have the opportunity to vote, and I would encourage and request everyone to exercise their franchise and come out in large numbers. Local issues are extremely important,… pic.twitter.com/mbd80gUF7D
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:55 AM
पुण्यात भाजपा १२५ जागा जिंकेल, महापौर आमचाच असेल; मुरलीधर मोहोळ यांना विश्वास
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केले. पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेसाठी मतदान सुरू आहे. मी माझ्या कुटुंबासोबत येथे आलो आणि माझ्या मतदानाचा हक्क बजावला. मला विश्वास आहे की, पुणेकरांनी गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामाची व्याप्ती पाहिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत मेट्रो केवळ कागदावर होती, पण आम्ही ती प्रत्यक्षात आणली आणि आज सुमारे दोन लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. मला विश्वास आहे की आम्ही १२०-१२५ जागा जिंकणार आहोत आणि महापौर भाजपचाच होईल.
VIDEO | Maharashtra Civic Polls 2026: Minister of State Murlidhar Mohol casts his vote for Pune Municipal Corporation elections. He says, "Voting is underway for local bodies and municipal corporation in Pune. I came here alongwith my family and used by right to vote. I believe… pic.twitter.com/Z6EBOePKTs
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:53 AM
मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई मनपा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक म्हणाले की, अनेक वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अखेर होत आहे. म्हणूनच ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. कोणाला किती मते मिळतील याबद्दल मला काही बोलायचे नाही.
#WATCH | Goregaon, Mumbai: After casting his vote for the BMC elections, former Uttar Pradesh Governor and BJP leader Ram Naik says, "After many years, this municipal corporation election is finally being held. That's why this election is so important... I don't want to say… pic.twitter.com/shOvPUhLkc
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:49 AM
मुंबईत ८३ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | Maharashtra: An 83-year-old woman arrived at the polling station in Mumbai to cast her vote in the BMC elections. pic.twitter.com/QiXz3Gvqnu
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:48 AM
गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले
#WATCH | Navi Mumbai: Maharashtra Minister Ganesh Naik, along with his family, casts his vote at Bonkode Polling Station for the local body polls. pic.twitter.com/ha6wPNKwGi
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:47 AM
परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील बूथ क्रमांक एक वरील ईव्हीएम मशीन बंद पडले. येथील बॅलेट युनिट चेंज करण्यात आले.
15 Jan, 26 : 08:47 AM
पुण्यात माजी राज्यमंत्र्यांवर पैसे वाटण्याची वेळ; काँग्रेसचा आरोप
माजी राज्यमंत्र्यांवर पैसे वाटण्याची वेळ...
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) January 14, 2026
ऐन संक्रांतीच्या शुभदिनी आपल्या मुलासाठी एका माजी राज्यमंत्र्यांवर घरोघर जाऊन पैसे वाटण्याची वेळ येणे अत्यंत दुर्दैवी आहे. जनतेने आपल्याला संधी दिली होती, तेव्हा आपण प्रामाणिकपणे विकासकामे केली असती, तर आज ही वेळ आली नसती.
ही निवडणूक… pic.twitter.com/qdRxB6w0P8
15 Jan, 26 : 08:45 AM
प्रशासनाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टींना आळा घालणे गरजेचे: रवींद्र चव्हाण
डोंबिवलीत पॅनल क्रमांक २९ मध्ये झालेल्या शिवसेना-भाजप राडा प्रकरणावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खरे तर असे घडणे योग्य नव्हते. येणाऱ्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.
15 Jan, 26 : 08:44 AM
दुबार मतदारांचा घोळ: किशोरी पेडणेकर
दुबार मतदारांचा घोळ घालून ठेवला, जिवंत नसलेल्या माणसांची नावे घातली. जिवंत असलेल्या माणसांची नावे काढली. मुंबईकरांची दिशाभूल करून मतदान होणार असले तर मतदार हुशार आहेत. नंबर असूनही मला मतदान करताना दीड मिनिटे लागले. आता रांगा वाढल्या की किती वेळ लागेल याचा विचार करा, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
15 Jan, 26 : 08:37 AM
मुंबई: मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी बजावला मतदानाचा हक्क
15 Jan, 26 : 08:36 AM
गणेश नाईकांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
एक तासाच्या धावपळी नंतर अखेर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पूर्ण, गणेश नाईक यांचे निवडणूक आयोग यंत्रणेच्या घोळावर गंभीर आरोप
15 Jan, 26 : 08:35 AM
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झाला असून, मतदान प्रक्रिया खोलबळी. तांत्रिक बिघाडामुळे अनेक ठिकाणी मशीन बंद. सुमारे वीस मिनिटात मशीन बंद. प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न
15 Jan, 26 : 08:34 AM
कोल्हापूरमध्ये मोठा खोळंबा, मतदान केंद्रांबाहेर रांगा
कोल्हापूरमध्ये खोळंबला झाला असून अनेक भागात मतदानाला सुरूवात झाल्यानंतर EVM मशीन बंद पडल्या आहेत. मतदारांनी मोठी गर्दी यावेळी मतदान केंद्राबाहेर केली आहे.
15 Jan, 26 : 08:28 AM
भाजप आमदार संजय केळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
आमदार संजय केळकर यांनी सकाळी ७:३० वाजता ठाण्यात आपला मतदानाचा हक्क बजावला. अधिकाधिक लोकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे केंद्र सरकारला जनतेचा लाभ झाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. ठाण्यातील मतदार देखील रेकॉर्डब्रेक यश देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जात-धर्माच्या भेदांपलीकडे जाऊन विकासाकडे पाहून मतदान करावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
15 Jan, 26 : 08:23 AM
पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मतदान केंद्रावर पोहोचले, पी. जोग विद्यालयामध्ये मुरलीधर मोहोळ करणार मतदान
15 Jan, 26 : 08:18 AM
माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
#WATCH | Pune, Maharashtra: Former Union Minister and senior BJP leader Prakash Javdekar casts his vote at a polling booth in Balshikshan School, Pune, for Maharashtra local body elections. pic.twitter.com/N2CZOomnZK
— ANI (@ANI) January 15, 2026
15 Jan, 26 : 08:04 AM
नागपूर: भय्याजी जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 : 08:00 AM
मुंबईत मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रावर काय घडतंय?
15 Jan, 26 : 07:59 AM
पुणे: अंकुश काकडे यांनी नोंदवला आक्षेप
तीन मतदान केल्यानंतर चौथा मतदान झाले, तेव्हा लाईट लागला नाही. ईव्हीएम मशीनमध्ये सात वाजून ४४ मिनिट म्हणजे १४ मिनिट जास्त दाखवत आहे, असा आरोप अंकुश काकडे यांनी मतदानाचा हक्क बजावताना केला.
15 Jan, 26 : 07:58 AM
मुंबई: भ्रष्ट व अकार्यक्षम पद्धतीने काम करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करा; मतदानाचा हक्क बजावताच मंत्री आशिष शेलार यांचे मतदारांंना आवाहन
15 Jan, 26 : 07:57 AM
पुणे: रवींद्र धंगेकर आणि मुलाचं औक्षण केलं, कसबा गणपती दर्शनाला निघाले
15 Jan, 26 : 07:56 AM
अमरावती महानगरपालिकेसाठी मतदान, ८७ जागेसाठी तब्बल ६६१ उमेदवार रिंगणात
15 Jan, 26 : 07:54 AM
वसई विरारमध्ये जय श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे
मतदान प्रक्रिया सुरू होत असतानाच वसईमध्ये जय श्रीराम आणि जय द्वारकाधीशचे झेंडे पाहायला मिळाले. वसई वसंत नगरी सर्कल ते एव्हरशाइन पर्यंत हे झेंडे लावण्यात आले आहेत.
15 Jan, 26 : 07:53 AM
जालना महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोडता इतर सर्वच पक्ष स्वबळावर
जालना महापालिका निवडणुकीसाठी शहरातील जवळपास अडीच लाख मतदार मतदानचा हक्क बजावणार आहे. जालना महापालिकेसाठी महाविकास आघाडी सोडता इतर सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. १६ प्रभागातील एकूण ६५ जागेसाठी मतदान प्रक्रिया.
15 Jan, 26 : 07:51 AM
कोणत्याही उमेदवाराला मतदान करा: मोहन भागवत
कोणत्याही मतदाराला मतदान करा पण मतदान करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोहन भागवत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
15 Jan, 26 : 07:47 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

15 Jan, 26 : 07:44 AM
जळगावात मतदानापूर्वी गोंधळ!
जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला.
15 Jan, 26 : 07:42 AM
मुंबई: आमदार आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन.

15 Jan, 26 : 07:28 AM
नागपूर: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर पोहोचले
VIDEO | Nagpur: RSS Chief Mohan Bhagwat arrives at Bhauji Daptari School to cast his vote in the BMC polls.#BMCpolls#Nagpur#RSS
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
(Full VIDEO available on https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/hzgLMM76KD
15 Jan, 26 : 07:25 AM
पुण्यात मतदानकेंद्र सज्ज, लवकरच मतदानाला सुरुवात
#WATCH | Pune, Maharashtra: Preparations and mock poll underway at a polling booth in New English School on Tilak Road.
— ANI (@ANI) January 15, 2026
Voting will begin from 7.30 am in 29 different Municipal Corporations across Maharashtra today. pic.twitter.com/1Hnk4wrhRS
15 Jan, 26 : 07:16 AM
विधानसभेच्या मतदार याद्या धरल्या ग्राह्य
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात.
15 Jan, 26 : 07:16 AM
मतदान केंद्रांबाहेर मतदारांची रांग लागायला सुरुवात
मुंबईत मतदानाला सुरुवात होताच विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. सकाळपासूनच नागरिक उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडत असून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
15 Jan, 26 : 07:15 AM
नांदेडचा किंग कोण...?
माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांचे नांदेडमध्ये वर्चस्व राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदाच भाजपचे नेते म्हणून मतदारांना सामोरे जात असताना 'पक्ष कोणताही असला तरी नांदेडचा किंग मीच' हे सिद्ध करू शकतील का, याकडेही लक्ष लागले आहे.
15 Jan, 26 : 07:14 AM
निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था
निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटचा समावेश आहे.
15 Jan, 26 : 07:14 AM
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १४० 'पाडू' उपलब्ध
मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्रात मतमोजणीवेळी काही तांत्रिक अडचण आल्यास 'पाडू' (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राद्वारे निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, 'पाडू'चा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १४० 'पाडू' उपलब्ध करण्यात आले आहेत.
15 Jan, 26 : 07:13 AM
नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक?
कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई येथे भाजप व शिंदेसेनेत अटीतटीची लढत आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे वरचढ की भाजपचे मंत्री गणेश नाईक ? आणि कल्याण डोंबिवलीत प्राबल्य शिंदेंचे की रवींद्र चव्हाणांचे याचा फैसला होणार आहे.
15 Jan, 26 : 07:12 AM
भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळावर
छत्रपती संभाजीनगर येथे अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या या महापालिकेवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम स्वबळ अजमावत आहेत.
15 Jan, 26 : 07:12 AM
पक्षांतरामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गाजली
लहानमोठ्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक गाजली. भाजपमध्ये अंतर्गत रुसवेफुगवे बघायला मिळाले.
15 Jan, 26 : 07:12 AM
नागपूर महापालिका भाजपचा गड
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांचे होमपिच असलेली नागपूर महापालिका भाजपचा गड मानली जाते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असेल.
15 Jan, 26 : 07:11 AM
अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांत अजित पवार आणि शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी भाजपच्या विरोधात एकत्र आल्याने येथील निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत.
15 Jan, 26 : 07:11 AM
मुंबईकर कौल कुणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
१९ वर्षांनंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्याविरोधात भाजप आणि शिंदेसेनेची महायुती अशी लढत असताना मुंबईकर कौल कुणाला देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
15 Jan, 26 : 07:10 AM
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस
सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीचे मतदान गुरुवारी होत आहे. ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार हे १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील.