Maharashtra elections 2019: Satara's by-election difficult for Udayan Raje; Shiv Sena leader made statement | महाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान 
महाराष्ट्र निवडणूक २०१९: उदयनराजेंसाठी साताऱ्याची पोटनिवडणूक कठिण; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याने केलं विधान 

मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल काही तासात लागणार आहे. त्याचसोबत राज्याचं लक्ष सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडे लागलेले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत बाजी मारतील की राष्ट्रवादी काँग्रेस आपला गड राखणार याची चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे. मात्र सातारा लोकसभा पोटनिवडणूक उदयनराजे भोसले यांच्यासाठी कठिण आहे. २४ तारखेच्या निकालात स्पष्ट होईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. 

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, उदयनराजे तीन महिन्यांपूर्वी एका पक्षातून निवडून येतात.  ३ महिन्यात तुमचं ह्दयपरिवर्तन होतं. दुसऱ्या पक्षात जाऊन लोकांवर निवडणूक लादता. लोकांना गृहित धरण्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. भाजपातून निवडणूक लढवायची होती तर आधीच लढवायची होती. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २०-२५ कोटी सरकारी तिजोरी खर्च करुन लोकांवर निवडणूक लादावी याचा परिणाम १०० टक्के  निकालात दिसेल असं त्यांनी सांगितले.

तसेच मी ज्या लोकांशी बोललो, मी माहिती घेतली त्यातून ही निवडणूक त्यांच्यासाठी कठिण आहे.  यापूर्वी उदयनराजे सहजपणे विजयी होईल सांगू शकत होते मात्र उदयनराजेही ठामपणे सांगू शकत नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी होणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देवून भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभेची निवडणूक जाहीर केली तरीही लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली नसल्याने उदयनराजेंची धाकधूक वाढली होती. अशातच दोन दिवसांनी जीआर काढून लोकसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. साताऱ्यामध्ये विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. तर लोकसभेचा एक मतदारसंघ. यापैकी दोन विधानसभा मतदारसंघांचा निकाल लवकर लागेल तर उर्वरित सहा मतदारसंघांचा निकाल विलंबाने म्हणजेच जवळपास 12 तास लागण्याची शक्यता आहे. यामध्ये माण आणि फलटण मतदारसंघांचा निकाल लवकर लागणार आहे. तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतर उर्वरित मतदारसंघांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

 मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरुन संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले की...

निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल; निकालाआधी केदारनाथाचं दर्शन

 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

सर्व्हेनुसार राज्यात 'या' ठिकाणी मनसे आणि वंचितला विजय मिळण्याची शक्यता

Web Title: Maharashtra elections 2019: Satara's by-election difficult for Udayan Raje; Shiv Sena leader made statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.