"शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:50 AM2024-04-25T11:50:17+5:302024-04-25T11:57:13+5:30

Lok Sabha Elections 2024 : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

Lok Sabha Elections 2024 Chandrashekhar Bawankule slams Sharad Pawar Over NCP affidavit | "शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला

"शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव दिलं आहे. तसेच या शपथनाम्यामधून शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, गरीब अशा समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचे शरद पवार गटाने म्हटलं आहे. यावरून आता भाजपाने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. 

शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व आहे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. २०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला असंही म्हटलं आहे. 

"शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने "शपथनामा" नावाने लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे.२६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही, खंजीराला महत्त्व आहे!!"

"१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले.१९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. १९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले."

"१९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली. २०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 Chandrashekhar Bawankule slams Sharad Pawar Over NCP affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.