महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 01:11 PM2024-03-25T13:11:17+5:302024-03-25T13:13:16+5:30

Mahadev Jankar Baramati, Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या निमित्ताने काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार या लढ्यात कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण असे चित्र असतानाच एक नवा ट्विस्ट येऊ घातला आहे.

Lok Sabha Election 2024 Will Mahadev Jankar fight from Baramati as there is a new twist before elections | महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट'

महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट'

Mahadev Jankar Baramati, Lok Sabha Election 2024: मुंबई - राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर महायुतीत परतले ते लोकसभेची एक जागा देण्याच्या अटीवर. आता चर्चा अशी आहे की त्यांना बारामतीतून महायुतीतर्फे लढवले जाईल. बारामती मध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत बघायला मिळेल असे चित्र असतानाच आता नवा ट्विस्ट येऊ घातला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया यांच्या विरोधात महादेव जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणून लढवली होती. जानकर ७० हजार मतांनी पराभूत झाले होते. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून त्यांनी आधीच बारामती मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. मात्र आता जानकर यांच्या एन्ट्रीमुळे वेगळे काही होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

नणंद विरुद्ध भावजय असा सामना बारामतीत होईल आणि त्यानिमित्ताने काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार या लढ्यात कोण जिंकणार याचा फैसला या निवडणुकीच्या निमित्ताने होणार असल्याने बारामतीतील लढतीची देशात उत्कंठा होती. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील आणि कदाचित त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर उभे केले जाईल, अशी ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाविकास आघाडीतर्फे माढा मतदारसंघात लढवले जाईल असे म्हटले जात होते. मात्र रविवारी अचानक जानकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले आणि त्यांनी महायुतीतच कायम राहण्याचा निर्णय घेतला. जानकर यांना परभणीतून महायुतीची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा माध्यमांमधून दिवसभर होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकर यांना महायुतीतर्फे बारामतीच्या मैदानात उतरविले जाऊ शकते.

Web Title: Lok Sabha Election 2024 Will Mahadev Jankar fight from Baramati as there is a new twist before elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.