राहुल गांधींच्या 'न्याय'वर टीका करायला गेले अन् शिक्षण मंत्र्यांचे गणित चुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:32 IST2019-04-04T16:32:14+5:302019-04-04T16:32:53+5:30

पालघरमध्ये भाजपमधून उमेदवारीसाठी शिवसेनेत गेलेले युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

education minister Vinod Tawade wrong in mathematics | राहुल गांधींच्या 'न्याय'वर टीका करायला गेले अन् शिक्षण मंत्र्यांचे गणित चुकले

राहुल गांधींच्या 'न्याय'वर टीका करायला गेले अन् शिक्षण मंत्र्यांचे गणित चुकले

पालघर : राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे कधी त्यांच्या पदवीवरून तर कधी त्यांच्या शिवराळ भाषेवरून नेहमीच वादात सापडले आहेत. आज त्यांनी पालघरमध्ये तर राहुल गांधी यांच्या न्याय योजनेचा गुणाकार करताना केलेल्या वक्तव्यावरून उपस्थितांमध्ये तावडेंची इयत्ता कंची, असा सवाल विचारण्यात येत होता. 


पालघरमध्ये भाजपमधून उमेदवारीसाठी शिवसेनेत गेलेले युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या न्याय योजेवर टीका केली. मात्र, बोलताना त्यांचा गुणाकार चुकला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 


'राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यात महिन्याला 7 हजार रुपये जमा करण्याची घोषणा केल्याने वर्षाला त्यांच्या खात्यात 72 हजार जमा होणार आहेत.', असे वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. या वक्तव्यामुळे शिक्षण मंत्र्यांचा गुणाकारच कच्चा असल्याची चर्चा पालघरमध्ये होत आहे.

 

Web Title: education minister Vinod Tawade wrong in mathematics