During the Modi government, rape of women increased - Raj Thackeray | मोदी सरकारच्या काळात महिलांवरील बलात्कार वाढले, राज ठाकरेंचा घणाघात
मोदी सरकारच्या काळात महिलांवरील बलात्कार वाढले, राज ठाकरेंचा घणाघात

पुणे -  मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेतून मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा लक्ष्य केले. यावेळी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सत्तेत नसताना महिला सुरक्षेचे राजकारण करणारे नरेंद्र मोदी आज मात्र बलात्काराच्या घटनांचे राजकारण करू नका असे सांगताहेत. निर्भया प्रकरणानंतरचा आढावा घेतला तर मोदींच्या काळात बलात्काराच्या घटना वाढल्या, असा टोला लगावला. 

महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर महिलांवरील बलात्काराचे राजकारण करू नका, असे म्हणताहेत. मात्र विरोधात असताना हेच नरेंद्र मोदीं महिलांवरील अत्याचारांसाठी सरकारला दोषी ठरवत होते.'' असा आरोप  राज ठाकरे यांनी केला. 

माढा येथील सभेत जातीचा उल्लेख करणाऱ्या नरेंद्र मोदींवरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यात कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत असं मोदी म्हणाले मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होता. मोदींच्या गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेत केला.   

दलितांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावलं, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो-हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना? मग नेमकी तुमची भूमिका काय? असा आरोप राज ठाकरेंनी केला.  


Web Title: During the Modi government, rape of women increased - Raj Thackeray
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.