“चंद्रपूरमध्ये भाजपाकडून घोडेबाजार, उद्धवसेनेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का?”: सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:31 IST2026-02-10T16:28:59+5:302026-02-10T16:31:04+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: चंद्रपूर महापौर निवडीबाबत उद्धवसेनेने जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

chandrapur municipal corporation mayor election 2026 congress harshwardhan sapkal criticized uddhav thackeray group and bjp | “चंद्रपूरमध्ये भाजपाकडून घोडेबाजार, उद्धवसेनेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का?”: सपकाळ

“चंद्रपूरमध्ये भाजपाकडून घोडेबाजार, उद्धवसेनेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का?”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत जो ट्विस्ट पाहायला मिळाला, त्याने सर्वांचाच धक्का बसला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपाला साथ दिल्याने चंद्रपूर महापालिकेत अखेर कमळ फुलले आहे. भाजपाच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताच्या फरकाने महापौर पदी निवडून आल्या, तर उपमहापौर पदासाठी झालेल्या ईश्वरचिठ्ठीच्या खेळात ठाकरे गटाच्या प्रशांत दानव यांनी बाजी मारली. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. 

चंद्रपूरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. उद्धवसेना हा पक्ष महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. एमआयएमने तटस्थ राहून भाजपाला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्याने भाजपाचा उमेदवार एका मताने विजयी झाला. उद्धवसेनेने चंद्रपुरात जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. परभणीत काँग्रेस पक्षाने अशीच भूमिका घ्यायची का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. 

भाजपा व एमआयएमची अदृष्य युती

चंद्रपूर महापौर निवडणुकीसंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा व एमआयएमची अदृष्य युती आहे, याचा अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूरनंतर चंद्रपुरातही प्रत्यय आला आहे. चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदतच केली आहे, भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

दरम्यान, काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांनी काँग्रेसला मदत केली असती तर काँग्रेसचा महापौर झाला असता. काँग्रेसचा महापौर बनवण्यासाठी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर या नेत्यांना एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला व त्यांनी एकत्र येऊन कामही केले, काँग्रेसमध्ये कोणतीच फाटाफूट झालेली नाही. या निवडणुकीचा अहवाल पक्ष निरीक्षकांकडून मागवण्यात येईल व नंतर त्यावर सखोल चर्चा केली जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

Web Title : चंद्रपुर: भाजपा पर खरीद-फरोख्त का आरोप; कांग्रेस ने उद्धव सेना के समर्थन पर सवाल उठाए

Web Summary : कांग्रेस ने चंद्रपुर महापौर चुनाव में भाजपा पर खरीद-फरोख्त का आरोप लगाया क्योंकि उद्धव सेना ने उनका समर्थन किया। सपकाल ने सवाल किया कि क्या कांग्रेस को परभणी में इसी तरह का जवाब देना चाहिए। उन्होंने भाजपा और एमआईएम पर गठबंधन का भी आरोप लगाया, जबकि कांग्रेस ने वीबीए के साथ एकजुट होने के प्रयासों का बचाव किया।

Web Title : Chandrapur: BJP's Horse-Trading Allegations; Congress Questions Uddhav Sena's Support

Web Summary : Congress alleges BJP horse-trading in Chandrapur mayoral election after Uddhav Sena supported them. Sapkal questions if Congress should reciprocate similarly in Parbhani. He also accuses BJP and MIM of an alliance, while defending Congress' efforts to unite with VBA.