शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 18:08 IST2024-05-01T18:07:33+5:302024-05-01T18:08:15+5:30
BJP Chitra Wagh News: मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सत्तेत होता त्यावेळी काय केले? कथनी आणि करणी यात फरक असतो, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
BJP Chitra Wagh News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाचे नाव घेतले नाही मग शरद पवारांनी या गोष्टी मनाला का लावून घेतल्या? संजय राऊत हा सर्वज्ञानी आहेत. संजय राऊत नेहमी काँग्रेसचे तुणतुणे घेऊन नाचायचे काम करतात. महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मी जात आहे याचाच भाग म्हणून बारामतीत आले आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्यांकडून असे वक्तव्य करणे शॉकिंग आहे. मात्र असे असले तरी यावेळी शरद पवारांच्या सुनबाईचं दिल्लीला जाणार हे नक्की आहे, असा विश्वास भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
मीडियाशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, रोहित पवारांनी बारामतीमधील एक महिला किंवा पुरुष दाखवावा, ज्यांनी मोदींच्या एकाही योजनेचा लाभ घेतला नाही. गरीब कल्याण योजना २० लाख लाभार्थी, पीएम आवास योजना ७८ हजार, आयुष्मान भारत साडेचार लाख, जनधन योजना १०० टक्के, जल जीवन मिशन योजना २ लाख,आणि पीएम किसान योजना अडीच लाख, स्वच्छ भारत मिशन ९६ हजार एवढ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेतला आहे. कोरोनाची लस आणली, त्याचे शरद पवार आणि कुटुंबीयही लाभार्थी आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही
कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही. कुठेतरी आमच्या विरोधात चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे काम विरोधक करीत आहेत. काँग्रेसच्या काळात संविधानात ९० बदल करण्यात आले आहे. ज्यांनी संविधान दिले, त्यांना निवडणुकीत दोनदा पाडण्याचे पाप या काँग्रेसने केले, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
दरम्यान, मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सत्तेत होता त्यावेळी काय केले? कथनी आणि करणी यात फरक असतो, ज्यावेळी सत्तेत असतात त्यावेळी सगळे विसरून जातात विरोधक आल्यावर त्यांना सगळं आठवते. त्या काय बोलतात याला महत्त्व नाही, त्यांची परिस्थिती बघून मला खूप हसायला येते. वाहनात बसून एखाद्याचे रील काढून घ्यायचे, लगेच व्हायरल करायचे हेच त्यांचे काम आहे. तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटणकरी. सुप्रिया सुळे यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, या शब्दांत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला.