भाजपकडे महापौरपद; शिंदेसेनेकडे स्थायी समिती; कोल्हापूर महापालिकेत फॉर्म्युला शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:10 IST2026-01-22T12:09:09+5:302026-01-22T12:10:50+5:30

महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी महायुतीचे होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना

BJP has the mayor post Shinde Sena has a standing committee Formula possible in Kolhapur Municipal Corporation | भाजपकडे महापौरपद; शिंदेसेनेकडे स्थायी समिती; कोल्हापूर महापालिकेत फॉर्म्युला शक्य

भाजपकडे महापौरपद; शिंदेसेनेकडे स्थायी समिती; कोल्हापूर महापालिकेत फॉर्म्युला शक्य

कोल्हापूर : मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा आग्रह शिंदेसेनेने मागे घेतल्याने कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. महायुतीत भाजपने २६ जागा जिंकून मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे महायुतीचा पहिला महापौर भाजपचा होईल, हे स्पष्ट झाले आहे. महापौरपद भाजपकडे गेले तर स्थायी समिती सभापतिपदावर शिंदेसेना आपला हक्क सांगणार आहे.

महानगरपालिका वर्तुळात आता नवीन पदाधिकारी निवडीची चर्चा सुरू झाली आहे. कोण होणार महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती याबाबत तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले आहेत. महापालिकेचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागच्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेत नेतृत्व केले आहे. पद वाटपाचे फाॅर्म्युले त्यांना माहीत आहेत. त्यामुळे ते सांगतील तो फाॅर्म्युले ठरविले जाण्याची शक्यता आहे.

वाचा: एकवेळ महापौरपद नाही मिळाले तरी चालेल पण काँग्रेससोबत आघाडी नाही, राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती

भाजपकडे महापौरपद गेल्यास उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापतिपद शिंदेसेनेकडे जाणार आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत हाच फॉर्म्युला अवलंबिला गेला होता. शिवसेनेला यापूर्वी सत्तेत वाटा मिळाला आहे. २०१५ ते २०२० या काळात शिवसेना एक होती तेव्हा परिवहन समिती सभापतिपद सलग चार वर्षे त्यांना दिले होते. हाच फाॅर्म्युला आता राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी वापरला जाऊ शकतो. महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी महायुतीचे होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांत उत्साह आहे. 

Web Title : भाजपा को महापौर पद, शिंदे सेना को स्थायी समिति: कोल्हापुर में फार्मूला संभव।

Web Summary : कोल्हापुर में भाजपा को महापौर और शिंदे सेना को स्थायी समिति मिलने की संभावना है। सत्ता-साझेदारी का फार्मूला कांग्रेस-राकांपा के पिछले समझौतों का पालन कर सकता है। महायुति द्वारा सभी पद धारण करने का यह पहला अवसर है।

Web Title : BJP likely to get Mayor post, Shinde's Sena, Standing Committee in Kolhapur.

Web Summary : Kolhapur may see BJP mayor as Shinde's Sena eyes standing committee. Power-sharing formula likely follows past Congress-NCP arrangements. This is the first time all positions may be held by Mahayuti.