Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:26 IST2026-01-16T10:25:34+5:302026-01-16T10:26:41+5:30

विजयाबद्दल साऱ्यांनाच कमालीची धाकधूक

BJP, Congress, Shinde Sena leading in Kolhapur Municipal Corporation election results | Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काल, गुरुवारी मोठ्या चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले. आज, शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चार ठिकाणी मतमोजणी सुरु असल्याने काही तासात निकाल हाती येणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप १५, शिंदेसेना ३, काँग्रेस १७, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, उद्धवसेना २ जागेवर आघाडीवर असल्याचा कल दिसत आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधून काँग्रेसचे राहुल माने सुरुवातीच्या कलात आघाडीवर. माजी स्थायी समिती सभापती शिंदेसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख पिछाडीवर आहेत. या मतदार संघात काटाजोड लढत झाल्याने निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. कारण शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते.

प्रभाग क्रमांक एकमध्ये काँग्रेसचे सुभाष बुचडे आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपच्या राजनंदा महाडिक आणि वंदना मोहिते  निर्णायक आघाडीवर आहेत.

गांधी मैदान निवडणूक कार्यालय येथे एका एका प्रभागाची मतमोजणी होणार असून पहिल्यांदा क्रमांक १० पासून सुरुवात होणार आहे. दुधाळी पॅव्हेलियनमध्ये प्रभाग क्रमांक सहाची पोस्टल मतमोजणी सुरू आहे. व्ही.टी.पाटील, रमणमळा याठिकाणी टपाली मतमोजणी सुरु झाली आहे. काही तासात महापालिकेवर काँग्रेस सत्ता राखणार की सत्तांतर होणार हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आपल्या भागातील स्थानिक उमेदवारांना मते देण्याकडे कौल, संमिश्र चिन्हामुळे उडालेला गोंधळ, प्रत्येक मतासाठी उमेदवारांनी लावलेल्या जोडण्या, त्यासाठी झालेला पैशाचा अमाप वापर यामुळे सर्वच प्रभागांत काटाजोड लढती झाल्या. परिणामी हमखास निवडून येऊ शकतो, असा अंदाज वर्तवणे भल्याभल्यांनाही जमले नाही. गुरुवारी दिवसभर प्रत्येकजण नक्की काय होणार याच धाकधुकीत आहेत.

Web Title : कोल्हापुर नगर निगम चुनाव 2026: मतगणना शुरू; कौन आगे, कौन पीछे?

Web Summary : कोल्हापुर नगर निगम चुनाव की मतगणना 66.54% मतदान के बाद शुरू हुई। शुरुआती रुझानों में भाजपा, शिंदे सेना और कांग्रेस कुछ वार्डों में आगे हैं। कड़ी प्रतिस्पर्धा और भारी खर्च चुनाव की विशेषता रही, जिससे भविष्यवाणी करना मुश्किल हो गया। परिणाम तय करेंगे कि कांग्रेस सत्ता बरकरार रखती है या नहीं।

Web Title : Kolhapur Municipal Election 2026: Counting Begins; Who's Leading, Who's Trailing?

Web Summary : Kolhapur Municipal Corporation election counting started after a 66.54% voter turnout. Early trends show BJP, Shinde Sena, and Congress leading in some wards. Tight contests and heavy spending marked the election, making predictions difficult. Results will determine if Congress retains power.