ठळक मुद्दे2018 मध्ये व्हिक्टोरिया सीक्रेटमध्ये रॅम्प वॉक करण्याची संधी विनीला मिळाली. हे तिचे स्वप्न होते.

 अनेक हॉलिवूड स्टार्सनी वेळोवेळी भारताला भेट दिली. वेगवेगळ्या कारणांनी हे स्टार्स भारतात आलेत. आता ग्लोबल स्टार आणि मॉडेल विनी हार्लो ही सुद्धा भारतात आली आहे. अर्थातच निमित्त खास आहे. Vogue Women Of The Year Awards 2019 मध्ये सहभागी होण्यास विनी हार्लो भारतात आली आहे. विनी हार्लोसोबत यु-ट्युबर व अमेरिकन टीव्ही शो होस्ट लिली सिंग आणि इराकी-अमेरिकन मेकअप आर्टिस्ट हुडा कटान हेही भारतात पोहोचले आहेत.


विनी हार्लो हॉलिवूडच्या लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहे. मूळची कॅनडाची असलेल्या विनीला ‘अमेरिकाज् नेक्स्ट टॉप मॉडेल’ या रिअ‍ॅलिटी शोद्वारे ओळख मिळाली होती. ती या शोमध्ये सहभागी होणारी एकमेव कॅनेडियन मॉडेल होती. अर्थात विनी शोमध्ये दुसºया आठवड्यातच एलिमिनेट झाली होती.


विनी लहानपणापासून vitiligo (कोड) या त्वचेच्या आजाराने ग्रस्त आहे. यामुळे तिच्या शरीरावर मोठमोठे पांढरे डाग आहेत. अर्थात विनीने हा आजार कधीच लपवला नाही. याऊलट ती यावर मोकळेपणाने बोलली. या आजारामुळे विनीला बरीच हेटाळणी सहन करावी लागली. एका मुलाखतीत विनी यावर बोलली होती.

‘लहानपणी मला मित्र बनवायचे होते. पण माझ्या वयाची मुलं मला गाय म्हणून चिडवायचे. माझी खिल्ली उडवायचे,’ असे ती म्हणाली होती. पण विनीने या सगळ्यांना तोंड देत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तुम्ही कसेही असाल तरी सुंदर असता, हे तिने जगाला पटवून दिले.

2018 मध्ये व्हिक्टोरिया सीक्रेटमध्ये रॅम्प वॉक करण्याची संधी विनीला मिळाली. हे तिचे स्वप्न होते. तिने अनेक दिग्गज हॉलिवूड सेलिब्रिटीसोबत काम केले. जगप्रसिद्ध हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनसोबत तिच्या मेकअप लाईनचे शूटही विनीने केले. याशिवाय बियॉन्से, सिया आणि एमिनेम यासारख्या टॉप सिंगर्सच्या म्युझिक व्हिडीओमध्येही ती झकळली.

Web Title: winnie harlow comes to india for vogue women of the year 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.