twitterati troll nick jonas after noticing green in his teeth during Grammy Awards 2020 | कल रात पालक खाया था क्या? नेटक-यांनी घेतली निक जोनासची मजा
कल रात पालक खाया था क्या? नेटक-यांनी घेतली निक जोनासची मजा

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी ग्रॅमी अवार्डमध्ये हजेरी लावली आणि सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. रविवारी संध्याकाळी प्रियंका व निक दोघेही ग्रॅमी अवार्ड 2020च्या रेड कार्पेटवर अवतरले. प्रियंकाचा बोल्ड लूक सगळीकडे चर्चेत राहिला तर निक जोनासने आपल्या भावांसोबत दिलेल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अर्थात चाहत्यांनी अशी काही गोष्ट नोटीस केली की, सोशल मीडियावर लोकांनी निकची खिल्ली उडवणे सुरू केले.


होय,  निक जोनासच्या दातात फसलेल्या अन्नकणांवर (हिरव्या रंगाचे काहीतरी)काही युजर्सची नेमकी नजर गेली आणि सोशल मीडियावर विनोदी मीम्सचा पूर आला.  निक तुझ्या दातात काय फसलेय? पालक की आणखी काही? जगाला उत्तर हवेय, यासारखे अनेक मजेशीर प्रश्न निकला विचारले गेलेत. केवळ इतकेच नाही तर आता तू नक्की दात गमावणार, असेही काहींनी लिहिले.या गोष्टीचा इतका बोभाटा झाला की, अखेर निकलाही यावर उत्तर द्यावे लागले. मी हिरव्या पालेभाज्या खातो, किमान हे तर तुम्हाला कळले, असे मजेशीर उत्तर निकने दिले. अर्थात याऊपरही मीम्स आणि जोक्सचा पूर ओसरला नाही.
यापैकी काही मजेशीर मीम्स तुम्ही खाली पाहू शकता.

Web Title: twitterati troll nick jonas after noticing green in his teeth during Grammy Awards 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.