बाबो! चक्क अंतराळात होणार या सिनेमाचे शूटींग; नासासोबत सुरु आहे चर्चा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 04:06 PM2020-05-06T16:06:15+5:302020-05-06T16:08:50+5:30

अ‍ॅक्शनच्या दुनियेत कधीही, कुणीही न पाहिलेला कारनामा...

tom cruise are planning to next film shooting in space-ram | बाबो! चक्क अंतराळात होणार या सिनेमाचे शूटींग; नासासोबत सुरु आहे चर्चा!!

बाबो! चक्क अंतराळात होणार या सिनेमाचे शूटींग; नासासोबत सुरु आहे चर्चा!!

Next
ठळक मुद्देटॉम लवकरच ‘टॉप गन-मेवरिक’ या सिनेमात दिसणार आहे.

 हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा सुपरस्टार टॉम क्रूज सतत पे्रक्षकांसाठी काही नवे घेऊन येतो. आता टॉम अ‍ॅक्शनच्या दुनियेत कधीही, कुणीही न पाहिलेला कारनामा करणार आहे. होय, टॉमच्या आगामी सिनेमाचे शूटींग पृथ्वीबाहेर अंतराळात होणार असल्याचे कळतेय.
पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. स्पेसमधील कथेवर आधारित हा सिनेमा एक अ‍ॅक्शन अ‍ॅडव्हेंचर सिनेमा असणार आहे. या सिनेमाचे शूटींग चक्क अंतराळात करण्याचा टॉमचा इरादा आहे. वृत्तानुसार, यासंदर्भात टॉमची  स्पेस-एक्स ही एविएशन कंपनी (ही एक खाजगी अमेरिकन एरोस्पेस निर्माता आणि अंतराळ परिवहन सेवा कंपनी आहे) आणि नासासोबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा यशस्वी झालीच आणि टॉमच्या या सिनेमाचे शूटींग अंतराळात झालेच तर  पृथ्वीबाहेर शूट झालेला पहिला सिनेमा असणार आहे.

अद्याप ही चर्चा व अंतराळात शूट करण्याचा प्लान सगळे काही प्राथमिक टप्प्यात आहे. चित्रपटाचे नाव, कलाकार असे काहीही अद्याप ठरलेले नाही. नासाने अद्याप याबद्दल कुठलाही अधिकृत खुलासा केलेला नाही.
तसे टॉमने याआधीही असे अनेक कारनामे केले आहेत. यापूर्वी मिशन इम्पॉसिबल या फिल्म सीरिजसाठी टॉमने अनेक थक्क करणारे अ‍ॅक्शन सीन्स केले आहेत. 2011 मध्ये रिलीज ‘मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल’ मधील बुर्ज खलिफावरचा अ‍ॅक्शन सीन असो की, ‘मिशन इम्पॉसिबल-रोग नेशन’मधील विमानातला अ‍ॅक्शन स्टंट असो त्याने कायम प्रेक्षकांना थक्क केले आहे.

टॉम लवकरच ‘टॉप गन-मेवरिक’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 1986 मध्ये रिलीज ‘टॉन गन’चा सीक्वल आहे. खूप आधीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. येत्या जूनमध्ये टॉमचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ‘टॉप गन-मेवरिक’ शिवाय टॉम ‘मिशन इम्पॉसिबल’च्या पुढच्या सीरिजवरही काम करतोय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: tom cruise are planning to next film shooting in space-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app