Emmy awards : ‘टायटॅनिक’ची ‘रोझ’ आठवते ना? 24 वर्षानंतर दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 04:13 PM2021-09-20T16:13:26+5:302021-09-20T21:48:29+5:30

‘टायटॅनिक’ची ही ‘रोझ’ पुन्हा चर्चेत आहेत. कारण आहे, एमी अवार्ड सोहळा

Titanic Actress Kate Winslet Then And Now She Took Emmy Awards 2021 For Outstanding Actress | Emmy awards : ‘टायटॅनिक’ची ‘रोझ’ आठवते ना? 24 वर्षानंतर दिसते अशी

Emmy awards : ‘टायटॅनिक’ची ‘रोझ’ आठवते ना? 24 वर्षानंतर दिसते अशी

Next
ठळक मुद्देवयाच्या 11 व्या वर्षी केट एका थिएटरशी जोडली गेली. 15 वर्षांची असताना ‘डार्क सीझन’ या ब्रिटीश टेलिव्हिजन सीरिजमध्ये ती पहिल्यांदा पडद्यावर झळकली.

‘टायटॅनिक’ (Titanic ) हा चित्रपट आठवतोय? या चित्रपटातील रोझला तर विसरणं शक्यचं नाही. ‘टायटॅनिक’मध्ये मुख्य भुमिकेत असलेली अभिनेत्री केट विन्सलेट (Kate Winslet) हिने रोझची ही भूमिका साकारली होती. 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 साली रिलीज झालेल्या ‘टायटॅनिक’ची ही रोझ पुन्हा चर्चेत आहेत. कारण आहे, एमी अवार्ड सोहळा. होय, यंदाच्या 73 व्या एमी अवार्ड सोहळ्यात (Emmy awards) केटने आऊटस्टँडिंग अ‍ॅक्ट्रेसचा पुरस्कार जिंकला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने केट रेड कार्पेटवर आली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

Mare of Easttown या अलीकडे रिलीज झालेल्या वेबसीरिजमधील शानदार अभिनयासाठी केटला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी ती स्टेजवर आली, तशी तिच्या सुंदर चेह-यानं सर्वांना घायाळ केलं.

‘टायटॅनिक’मध्ये केट व लिओनार्दो डि-कॅप्रियो मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या जोडीवर अख्खं जग फिदा झालं होतं. चित्रपटात जॅक व रोझ साकारणाºया अभिनेता लिओनार्दो डि-कॅप्रियो आणि अभिनेत्री केट विन्सलेट या जोडीची केमिस्ट्री, त्यांची अलवार प्रेमकहाणी आजही पे्रक्षक विसरू शकलेले नाहीत. जेम्स कॅमरूनच्या या सुपरहिट चित्रपटानं ऑस्कर, ग्रॅमी असे अनेक मानाचे पुरस्कार पटकावले होते. 

वयाच्या 11 व्या वर्षी केट एका थिएटरशी जोडली गेली. 15 वर्षांची असताना ‘डार्क सीझन’ या ब्रिटीश टेलिव्हिजन सीरिजमध्ये ती पहिल्यांदा पडद्यावर झळकली. केटने आत्तापर्यंत 3 लग्न केलीत. 1998 मध्ये तिनं जिम थ्रिलनेटसोबत लग्नगाठ बांधली. या जोडप्याला एक मुलंही आहे. 2001 मध्ये केट व जिम विभक्त झालेत. घटस्फोटाच्या 2 वर्षानंतर तिनं सॅम मॅनडेससोबत लग्न केलं. पण हे लग्नंही फार काळ टिकलं नाही. 2011 मध्ये तिनं सॅमपासून घटस्फोट घेतला. 2012 साली तिनं नेड रॉकएनरोलसोबत तिसºयांदा संसार थाटला.

एम्मी अवॉर्ड्स सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

73व्या एम्मी अवॉर्ड्स सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लायन्सगेट प्लेवर पार पडले. लायन्सगेट प्ले हा स्टार्झ या ओटीटी प्लॅटफॉर्म सर्व्हीसचा जागतिक स्तरावरील प्रमुख कंटेट लीडर आहे.लायन्सगेट प्लेवर नेहमी सर्वोत्तम जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोहळे आणि कार्यक्रम, शोची मेजवानी असते. 73व्या एम्मी अवॉर्ड्स सोहळ्याने त्यात आणखी भर पडली आहे. 73 व्या एम्मी अवॉर्ड्स सोहळा हा सेड्रिकने आयोजित केला असून लॉस एंजलिस (अमेरिका) या जगप्रसिद्ध शहरातून जगभरात प्रक्षेपित केला जाणार आहे. भारताचा विचार करता हा सोहळा लायन्सगेट प्लेवर हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि भोजपुरी या सहा भाषांमध्ये प्रसारित केला जाईल.

Web Title: Titanic Actress Kate Winslet Then And Now She Took Emmy Awards 2021 For Outstanding Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app