Thanos actor Josh Brolin and wife Kathryn welcomes baby girl on Christmas evening | खूशखबर! 'थानोस' ऊर्फ जोश ब्रोलिनच्या घरी मुलीचा जन्म, फोटो शेअर करून दिली माहिती...

खूशखबर! 'थानोस' ऊर्फ जोश ब्रोलिनच्या घरी मुलीचा जन्म, फोटो शेअर करून दिली माहिती...

हॉलिवूड अभिनेता जोश ब्रोलिन आणि पत्नी कॅथरीनच्या घरी ख्रिसमसच्या दिवशी एका परीचं आगमन झालं आहे. कॅथरीनने २५ डिसेंबर २०२० ला एका गोड मुलीला जन्म दिलाय. याची माहिती कॅथरीनने स्वत: सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. सोबतच त्यांनी मुलीचं नावही ठेवलं आहे.

कॅथरीनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून मुलीचा फोटोही शेअर केलाय. या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनही लिहिलं आहे. 'बेबी चॅपल, जन्म सायंकाळी ६.२० मिनिटांनी, तारीख १२/२५/20, आमची छोटीशी ख्रिसमस एंजेल. चॅपेल ग्रेस ब्रोलिना'. कॅथरीनच्या या फोटोवर अनेक लोक कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

तेच जोश ब्रोलिन यानेही मुलीचा एक छान फोटो शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने सांगितले आहे की, मुलीचं नाव चॅपेलल ग्रेस का ठेवलंय. ब्रोलिनने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की, त्याने धार्मिक भावनेसोबत मुलीचं नाव चॅपल ठेवलं आहे. त्याला नेहमीच त्याच्यासोबत देव असल्याची जाणीव होते. अशात हे नाव दोघांसाठीही खास आहे. 

२०१६ मध्ये जोशने कॅथरीनसोबत लग्न केलं होतं. दोघांना एक दोन वर्षांची मुलगी विस्लीन रीनही आहे. कॅथरीनआधी जोशचं एलिस अडॅरसोबत लग्न झालं होतं. एलिसकडून त्याला दोन मुले होती. तसेच त्याने डायना लेनसोबतही लग्न केलं होतं. कॅथरीन जोशची तिसरी पत्नी आहे.

जोश ब्रोलिनच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर त्याने अनेक सिनेमे केले आहेत. पण त्याला मार्वलच्या 'थानोस'च्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. याच भूमिकेमुळेच त्याला ओळख मिळाली. त्यासोबतच जोश like No Country for Old Men, Inherent Vice आणि Deadpool 2 मध्येही दिसला होता.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Thanos actor Josh Brolin and wife Kathryn welcomes baby girl on Christmas evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.