ठळक मुद्दे४ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेली मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे.

डचेज आॅफ ससेक्स मेगन मार्कल लवकरच आई होणार आहे. गत आॅक्टोबर महिन्यात मेगन आई होणार असल्याची बातमी जगजाहिर करण्यात आली होती. तूर्तास मेगन आपली प्रेग्नसी एन्जॉय करतेय. याचदरम्यान ‘मॉम टू बी’ मेगनने प्रिन्स हॅरीसोबत लंडनमध्ये पार पडलेल्या रॉय व्हरायटी परफॉर्मन्समध्ये हजेरी लावली आणि सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. या सोहळ्यात मेगन बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये रॉयल मॉम सर्वांसमोर आली. प्रिन्स हॅरीच्या हातात हात घालून तिने एन्ट्री घेतली.


पुढील वर्षी मेगन आई होणार आहे. त्यापूर्वी मेगन आणि हॅरी दोघेही विंडसरस्थित नव्या रॉयल कॉटेजमध्ये राहायला जाणार असल्याचे कळतेय.

 

या कॉटेजमध्ये १० शयनकक्ष आहेत. हे कॉटेज महाराणी एलिजाबेथ द्वितीयच्या मालकीची संपत्ती आहे. तूर्तास मेगन व हॅरी लंडनमध्ये केन्सिंटन पॅलेसच्या नॉटिंघम कॉटेजमध्ये राहतात.


४ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेली मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल लग्नबंधनात अडकले होते. प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्कल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती.

त्यानंतर २०११मध्ये तीने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचा असून मेगन ३६ वर्षांची आहे. प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.

Web Title: SEE PICS: SEE PICS: Meghan Markle's First Royal Variety Performance Alongside Prince Harry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.