Rapper T.I. says he visits the gynecologist every year with daughter to "check her hymen" | धक्कादायक! मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाला तिची व्हर्जिनिटी टेस्ट करतो हा रॅपर !
धक्कादायक! मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाला तिची व्हर्जिनिटी टेस्ट करतो हा रॅपर !

ठळक मुद्दे टीआयने तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे.

 अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर टीआय  याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा   केला आहे. होय, टीआयला 18 वर्षांची मुलगी आहे. टीआय दरवर्षी आपल्या या मुलीची व्हर्जिनिटी टेस्ट अर्थात कौमार्य चाचणी करतो.
एका चॅट शोमध्ये टीआयने खुद्द हा खुलासा केला. त्याने सांगितले की, माझी 18 वर्षीय मुलगी असून तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी तिची वर्जिनिटी टेस्ट करतो. त्याचे हे शब्द ऐकून चॅट शोचा होस्टही थक्क झाला. टीआय गंमत करतोय, असे आधी त्याला वाटले. पण टीआय गंभीर आहे म्हटल्यावर तोही अवाक् होऊन ऐकू लागला.

 मुलीसोबत सेक्सबाबत बोलतोस का? असा प्रश्न होस्टने टीआयला केला होता. होस्टचा उद्देश सेक्स एज्युकेशनबद्दल विचारणे हा होता. मात्र टीआयने भलताच खुलासा केला. तो म्हणाला की, माझ्या मुलीच्या दर वाढदिवसाला मी तिची व्हर्जिनिटी टेस्ट करतो.  माझी मोठी मुलगी 18 वर्षांची आहे आणि अद्याप व्हर्जिन आहे. ती गायनेकॉलॉजिस्टकडे जाते त्यावेळी मी सुद्धा जातो. मला तिच्या व्हर्जिनिटी टेस्टचा रिझल्ट सांगा, असे मी डॉक्टरांना म्हटल्यावर आधी त्यांनी यावर आक्षेप घेतला. मुलीच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणतीही माहिती देता येणार नाही, असे डॉक्टरांनी म्हटले. पण माझ्या मुलीने परवानगी दिली.

टीआयच्या या धक्कादायक खुलाशानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच त्याच्या चाहत्यांकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे.  त्याची मुलगी डेजाह हॅरिस हिने अद्याप अधिकृत कोणतेही विधान केलेले नाही. मात्र वडिलांवर टीका करणाº्या काही ट्वीट्सला तिने लाइक केले आहे. यापूर्वी सुद्धा टीआयला 2009 मध्ये अनधिकृतरित्या मशीन गन खरेदी केल्याप्रकरणी सात महिने तुरुंगात झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये ड्रग्ज प्रकरणी सुद्धा दहा महिने तुरुंगाची शिक्षा भोगावी लागली होती.   टीआयने तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे.

Web Title: Rapper T.I. says he visits the gynecologist every year with daughter to "check her hymen"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.