पॉप स्टार सिंगर रिहाना पुन्हा चर्चेत आली  आहे. रिहाना कायमच सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते.आता पुन्हा एकदा रिहानाने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने कोमावरही टीका टीप्पणी केली नाहीय तर तिच्या नविन हेयरस्टाइलमुळे चर्चेत आली आहे. आजकाल ती आपल्या स्टाइलमुळेच जास्त चर्चेत आहे.

ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. रिहानाने तिच्या ब्रँडसाठी  तिने फोटोशूट केले आहे. फोटोशूटसाठी तिने फ्लोरल बिकिनीमध्ये पोज दिल्याचे पाहायला मिळतंय. या सगळ्यांमध्ये तिच्या  आकर्षक हेयरस्टाइलमुळेच सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोसह तिने समर्क असे कॅप्शनही दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच रिहानाने असेच एक फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्या फोटोने सा-यांचा संताप झाल होता. एरव्ही तिच्या प्रत्येक फोटोंवर घायाळ होणारे तिचे फॅन्स यावेळी प्रचंड संतापले होते. कारण रिहानाचा कारनामा पाहून सा-यांनीच तिच्यावर टीका केली होती.

रिहानाने लॉन्जरी ब्रँडसाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस पोज देताना दिसत होती.  इथरच रिहाना थांबली नाही तर तिने गळ्यात गणपतीचे पेडेंट घातल्याचे पाहायला मिळाले.  टॉपलेस फोटोमध्ये अशा प्रकारे गणपतीचे पेडंट परिधान केल्याचे पाहून सोशल मीडियावर रिहानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. सोशल मीडियावर रिहानावर प्रचंड टीकेची झोड उठली होती. 


काय सांगता, एका ट्विटसाठी पॉप सिंगर रिहानाला मिळाले इतके कोटी, कंगणा राणौतचा पुन्हा संताप

रिहानाच्या गेल्या वर्षभरातील ट्विटचा अभ्यास केल्यास, रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले आहेत. म्हणजे, जानेवारी 2021 पासून ते आजतायागय म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंतचं तिचं ते सर्वात सुपरहीट ट्विट ठरलंय.शेतकरी आंदोलनासंदर्भात रिहानाने केलेल्या ट्विटला, 3 दिवसांतच 3 लाख 41 हजार 900 रिट्विट मिळाले आहेत. तर, 8 लाख 42 हजार लाईक्सचा पाऊस पडलाय. 1 लाख 55 हजार नेटीझन्सने त्यावर कमेंट केल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pop star Rihanna spring photoshoot for her Lingerie Label

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.