वयाच्या २१ व्या वर्षांपासून अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीशी संबंधित असलेली मिया खलिफा गेल्या काही दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत आहे. नुकताच तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर तिने बीबीसी हिंदीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने खासगी व प्रोफेशनल लाईफबद्दल खुलासा केले. 

मिया खलिफाला ग्रॅज्युएशननंतर जॉब शोधत होती. त्यावेळी तिला रस्त्यावर एक मुलगा भेटला ज्याने तिला तिच्यासोबत काम करायचं असल्याचं सांगितलं. त्याचा अ‍ॅडल्ट फिल्मचा बिझनेस होता. त्याने तिला तू सुंदर आहे आणि न्यूड मॉडेलिंगमध्ये चांगली वाटशील असं सांगितलं होतं. त्यानंतर ती त्याच्या फ्लोरिडातील स्टुडिओत गेली. स्टुडिओ खूप सुंदर होता.तिथे काम करणारे लोक चांगले वाटले. तिला तिथे अनकंम्फर्टेबल असं काही वाटलं नाही. तिथे पहिल्यांदा तिने पॉर्न सिनेमा नाही तर दुसऱ्यांदा पॉर्न फिल्ममध्ये काम केलं होतं. पहिल्यांदा तिथे गेल्यावर बोलणं झालं आणि पेपरवर्कबद्दल बोलणं झालं होतं, असं मियानं सांगितलं.


मिया खलिफा सोशल मीडियावरील स्टार आहे. तिचे इंस्टाग्रामवर १.६ कोटी फॉलोवर्स आहेत. तिला अ‍ॅडल्ट फिल्म्समुळे प्रसिद्धी मिळाल्याचं ती मानते.

तिने सांगितलं की, जेव्हा तिने इंडस्ट्री सोडली तेव्हा तिचं इंस्टाग्राम अकाउंट ISISच्या समर्थकांनी हॅक केलं होतं. तिच्याबद्दल दुष्प्रचार केला होता. त्यानंतर तिने तिचं इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं होतं.

एका वर्षापर्यंत तिने दुसरं अकाउंट नव्हतं सुरू केलं. जेव्हा तिने तिच्या नशीबाला स्वीकारत माजी अ‍ॅडल्ट स्टारला नरेटिव्हमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिने तिचं इंस्टावर नवीन अकाउंट सुरू केलं.

Web Title: Mia Khalifa Viral Interview About Personal And Professional Life And Leaving Adult Film Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.