ठळक मुद्देजॉय स्टैर्लेने 2016मध्ये मिस सुपरनॅशनल वेल्सचा किताब जिंकला होता.

सुंदर चेहरा, बुद्धी असे सगळे काही असूनही नवरा मुलगा मिळत नाहीये, याला तुम्ही काय म्हणाल? होय, जॉय स्टैर्ले या सौंदर्यवतीची समस्या नेमकी हिच आहे. आरस्पानी सौंदर्य हेच तिच्या लग्नाच्या आड येतेय. 23 वर्षांच्या जॉयने गेल्या काही वर्षात देशभरातील कित्येक सौंदर्य स्पर्धांचे किताब पटकावले. पण जोडीदाराचे म्हणाल तर ती शोधून शोधून थकली. देखण्या रूपामुळे  चांगली मुलं भेटत नसल्याचा दावा तिने केला आहे.

तिचे सौंदर्य पाहून खरे तर प्रत्येक जण तिच्याकडे आकर्षित होत. पण जॉयचे मानाल तर यापैकी बहुतांश पुरूष तिच्या शारिरीक सौंदर्यावर भाळतात. ‘मी जशी राहते, दिसते त्यामुळे माझ्याकडे विचित्र मुलंच आकर्षित होतात. याऊलट चांगली मुले माझ्यासोबत बोलताना संकोचतात. एखादा दयाळू, कुटुंबाकडे लक्ष देणारा, करिअरला महत्त्व देणा-या मुलाच्या शोधात आहे,’ असे जॉयने सांगितले.


चांगला जोडीदार मिळावा यासाठी जॉयने एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, आता ब्युटी पेजेंट सोडून जॉय एका ब्लाइंड डेट शोमध्ये जाणार आहे. मेकअपविना ब्लाइंड डेट अशी या शोची थीम आहे. देखणा चेहरा आणि शारिरीक आकर्षणाशिवायही एक सुंदर नाते जोडता येते, हे सांगणे हा या शोचा खरा उद्देश आहे. जॉय आत्तापर्यंत कधीही मेकअपविना वावरली नाही. पण योग्य आणि मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी ती आता नो मेकअप लूकमध्ये या शोमध्ये सहभागी होणार आहे. आहे ना कमाल?


जॉय स्टैर्लेने 2016मध्ये मिस सुपरनॅशनल वेल्सचा किताब जिंकला होता. यासह तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये पारितोषिके जिंकली आहेत. आगामी बीबीसी वेल्सच्या ब्यूटी क्वीन सीरिजमध्ये तिची झलक पाहायला मिळणार आहे.


  

Web Title: Meet the beauty queen who says she is unlucky in love because of her good looks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.