हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरोचा स्टॅच्यू लॉस अँजेलिसमधील हॉलिवूड आर्ट स्पेसमधून गायब झाला आहे. हा स्टॅच्यु पेंटेंड स्टेनलेस स्टीलसोबत अॅल्युमिनियमचा वापर करून बनविला आहे. लॉस अँजेलिसच्या पोलिसांनी हरवलेल्या पुतळ्याचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, लॉस अँजोलिसचे काउंसिलमॅन मिच ओफॅरेलनं केएनबीसी टिव्हीला सांगितलं की, आमच्याकडे साक्षीदार आहे ज्याने कोणाला तरी स्टॅच्युवर चढताना पाहिले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीला तो स्टॅच्यु आणि बॅग घेऊन पळताना पाहिलं. अद्याप या बॅगेत काय होतं ते समजू शकलेलं नाही.

 
मर्लिन मुनरो हॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नावजली जाते. तिचे सौंदर्य, ग्लॅमर व प्रेमाचे किस्से आणि अचानक झालेल्या मृत्यूमुळे ती खूप चर्चेत आली होती. मुनरोचं नाव अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन कैनेडी पासून गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबॉल खेळाडू जो डिमॅगियोसोबत जोडलं गेलं होतं. ती बऱ्याच लोकांसोबत लग्नबेडीत अडकली पण ती अयशस्वी ठरली. 


एक दिवस अचानक १९६२ मध्ये तिच्या मृत्यूची बातमी आली. त्यावेळी ती जवळपास ३५ ते ३६ वर्षांची होती. तिचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

तिचा मृत्यू गुढ रहस्य बनून राहिलं आहे.


Web Title: Marilyn Monroe statue stolen from Hollywood Walk of Fame
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.