Met Gala 2021: रेड कार्पेटवर मेडोनाच्या लेकीनं केलं असं काही की जगभर रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 05:38 PM2021-09-16T17:38:17+5:302021-09-16T17:39:51+5:30

Met Gala 2021: लोर्डेसने एकापेक्षा एक झक्कास पोझ दिल्या आणि याचवेळी तिनं असं काही केलं की, अख्ख्या इव्हेंटमध्ये आणि सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा झाली.

Madonna daughter lourdes leon flaunts her armpit hair at met gala 2021 | Met Gala 2021: रेड कार्पेटवर मेडोनाच्या लेकीनं केलं असं काही की जगभर रंगली चर्चा

Met Gala 2021: रेड कार्पेटवर मेडोनाच्या लेकीनं केलं असं काही की जगभर रंगली चर्चा

Next
ठळक मुद्दे   याआधी लोर्डेसची आई मेडोनाने सुद्धा आर्मपीट हेअर फ्लॉन्ट करत, जगाला हाच स्ट्रॉन्ग संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.  

मेट गाला म्हणजे जगातील सर्वात मोठी फॅशन जत्रा. जगभरातील मोठमोठ्या सेलिब्रिटी आणि या सेलिब्रिटींचे चित्रविचित्र पोशाख, यामुळेच हा इव्हेंट दरवर्षी गाजतो. पण यंदा हा इव्हेंट एका वेगळ्या कारणांसाठी गाजला. निमित्त ठरली हॉलिवूडची पॉप क्वीन मेडोनाची (Madonna) लेक लोर्डेस लियॉन ही.लोर्डेस लियॉन (Lourdes Leon)पहिल्यांदाचा मेट गाला 2021 मध्ये सहभागी झाली होती.  पिंक कलरचा ब्रालेट स्कर्ट, मोकळे केस अशा थाटात लोर्डेस ‘मेट गाला 2021’च्या (Met Gala 2021)रेड कार्पेटवर उतरली. यादरम्यान सर्व कॅमेरे तिच्यावर खिळले. लोर्डेसने एकापेक्षा एक झक्कास पोझ दिल्या आणि याचवेळी तिनं असं काही केलं की, अख्ख्या इव्हेंटमध्ये आणि सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा झाली.

होय, कॅमेरे समोर येताच लोर्डेस लियॉनने डावा हात वर करत, आर्मपीट हेअर (काखेतले केस) फ्लॉन्ट केलेत. तिचे हे फोटो जगभर व्हायरल झालेत. हे करताना ती ना लाजली, ना काही लपवायचा प्रयत्न केला.   साहजिकच तिच्या या कृत्याची चर्चा झाली. काहींनी तिच्या या धाडसाचं कौतुक केलं तर काहींनी तिला पाहुन नाक मुरडली.

काखेत केस हे महिलांना लाजिरवाणं वाटतं. पण आजघडीला अनेक महिलांना हे मान्य नाही. शरीरावरचे केस ही काही लाजिरवाणी बाब नाही. ते काढायचे की नाहीत, हा महिलांचा स्वत:चा निर्णय असू शकतो, अशी त्यांची भूमिका आहे.   याआधी लोर्डेसची आई मेडोनाने सुद्धा आर्मपीट हेअर फ्लॉन्ट करत, जगाला हाच स्ट्रॉन्ग संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.  आता लोर्डेसनेही ‘मेट गाला 2021’च्या व्यासपीठावरून हाच संदेश दिला. अर्थात अनेकांना तिचं हे वागणं चुकीचं वाटलं. बाईच्या जातीला अशा गोष्टी शोभत नाही, अशा प्रतिक्रियाही उमटल्या. अनेकांनी याला अश्लिल प्रकारात मोडलं. पण अनेकांनी तिच्या या कृत्याचं कौतुक केलं. एकंदर काय तर मेट गाला 2021 चा इव्हेंट लोर्डेसच्या नावानं चांगलाच गाजला.

Web Title: Madonna daughter lourdes leon flaunts her armpit hair at met gala 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app