हॉलिवूडची सुपस्टार व अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नावाचा समावेश असणारी अभिनेत्री काइली जेनर अभिनयासोबत बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता तिने तिच्या बहिणीसोबत बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


काइलीने तिची बहिण केंडल जेनरसोबत मॅचिंग मोनोकिनी परिधान करून फोटोशूट केले. सोशल मीडियावर या फोटोंना खूप पसंती मिळते आहे आणि हे फोटो खूप व्हायरल होत आहे.


काइली या फोटोंमध्ये स्विमिंग सूटमध्ये दिसते आहे. खूपच बोल्ड व हॉट अंदाजात दिसते आहे.


काइली जेनर सोशल मीडियावर सक्रीय असून ती ग्लॅमरस व बोल्ड फोटो शेअर करत असते.


काइली जगातील सर्वात कमी वय असणारी अरबपती आहे. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिच्या नावाचा समावेश आहे.


रिपोर्ट्सनुसार काइली जेनरकडे एकूण ९० कोटी डॉलर (जवळपास ६ हजार कोटी रुपये) हून जास्त संपत्ती आहे.


काइली जेव्हा २० वर्षांची होती तेव्हा ती लग्नाआधीच एका मुलीची आई झाली होती. २०१८ साली तिने स्टोर्मीला जन्म दिला होता.


२०१७ साली काइली ट्रैविस स्कॉटसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनी लग्नदेखील केले नव्हते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रैविस स्कॉटसोबत ती जवळपास दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ती वेगळी झाली होती. 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kylie Jenner may not have intended to become a self-made billionaire at the age of 21 tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.