ठळक मुद्देजस्टीन बीबरची तरूणाईत प्रचंड क्रेझ आहे.

आपल्या गाण्यांनी जगभरातील तरूणाईला वेड लावणारा पॉप सिंगर जस्टीन बीबरने 2008 साली गायनाला सुरुवात केली आणि त्याच्या गाण्यांनी तरूणाईला भुरळ घातली. उण्यापु-या वयाच्या 13 व्या वर्षी तो ग्लोबल स्टार बनला. जस्टीनचे जगभर चाहते आहेत. पण आता या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, जस्टीन एका गंभीर आणि दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. खुद्द जस्टीनने  सोशल मीडियावर ही माहिती दिली.


जस्टीनचा आजार सामान्य आजार नाही. Lyme diseaseनावाचा हा आजार आहे. या आजाराबद्दल माहिती देताना त्याने लिहिले, ‘जस्टीन बीबर अलीकडे खूप घाणेरडा दिसतोय, असे अनेक लोक म्हणत आहेत. पण मी आजारी आहे, हे ते पाहू शकत नाहीत. अलीकडे मला Lyme disease असल्याचे निदान झाले. केवळ हेच नाही तर chronic monoचेही निदान झाले होते. यामुळे माझी त्वचा, माझा मेंदू, माझ्या शरीराची उर्जा एकंदर काय तर अख्खा शरीरावर परिणाम झाला आहे.’


आपल्या या आजारावर जस्टीन बीबर लवकरच एक डॉक्युमेंट्री घेऊन येणार आहे. यु ट्यूबवर ही डॉक्युमेंट्री अपलोड होणार आहे. ही डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर मी कशातून जातोय, हे तुम्हाला कळेल, असे जस्टीनने लिहिले आहे.

गेली काही वर्षे खूप कठीण होती. पण लवकरच मी या आजारातून बाहेर पडले आणि परत येईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
जस्टीन बीबरची तरूणाईत प्रचंड क्रेझ आहे. त्याची सगळी गाणी लोकप्रिय आहेत.  विशेषत:  बेबी, लव्ह युवरसेल्फ ,  से सॉरी ,  वॉट डू यू मीन लेट मी लव्ह यू ही गाणी तुफान गाजलीत. 

Web Title: justin bieber suffering from a rare disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.