jennifer lopez goes naked for her new track in the morning video | 51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ

51 वर्षाच्या जेनिफर लोपेजचा बोल्ड अवतार, शेअर केला न्यूड डान्स व्हिडीओ

ठळक मुद्देजेनिफर लोपेज ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती आहे. इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

51 वर्षाची अमेरिकन सिंगर व अ‍ॅक्ट्रेस जेनिफर लोपेज हिच्या एका व्हिडीओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. जेनिफरने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. हा व्हिडीओ तूर्तास वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत जेनिफरने न्यूड पोज दिल्या आहेत.
 हा व्हिडिओ जेनिफरच्या ‘इन द मॉर्निंग’ या नवीन गाण्याचा आहे. जो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. जेनिफर या व्हिडिओत कपड्यांशिवाय दिसत आहे. तसेच तिच्या शरीरावर परीसारखे पंख लावले आहेत.

‘मी तुझ्यावर माझ्यापेक्षा अधिक प्रेम केले. हा व्हिडिओ म्हणजे एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा असून सांकेतिकांनी परिपूर्ण आहे. तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वत: ला बदलू शकता. त्यामुळे तुमच्या पंखांना जन्म द्या आणि  जिथे तुमची काहीच किंमत नाही, तेथून दूर जा,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना जेनिफरने लिहिले आहे.
जेनिफर लोपेजचा हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क आहेत. पन्नासी ओलांडलेल्या जेनिफरने ज्याप्रकारे स्वत:ला फिट ठेवले आहे, ते पाहून अनेक चाहते तिचे कौतुक करत आहेत. तिच्या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडतोय. 

 जेनिफर लोपेज ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती आहे. इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. 1999 मध्ये तिने आपला पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केला.यापूर्वी जेनिफर ‘हसलर्स’ चित्रपटात शेवटची दिसली होती. हा चित्रपट एका क्राइम ड्रामावर आधारित होता. या चित्रपटात जेनिफरशिवाय लिली रीनहर्ट, ज्युलिया स्टिल्स, केके पामर, कार्डी बी आदी कलाकार मुख्य भुमिकेत दिसले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: jennifer lopez goes naked for her new track in the morning video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.