अमेरिकन सिंगर व अभिनेत्री जेनिफर लोपेज आणि रिटायर्ड बेसबॉल खेळाडू एलेक्स रॉड्रिगेज सध्या त्यांच्या लग्नांच्या वृत्तांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ते दोघे मार्चच्या अखेरपर्यंत लग्नबेडीत अडकू शकतात. जर त्या दोघांनी लग्न केलं तर त्यांच्या नावाचा समावेश श्रीपंत जोडप्यांमध्ये होऊ शकतो. दोघे खूप श्रीमंत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची एकत्रित कमाई ५३५१ कोटींहून जास्त आहे. पॉप स्टर लोपेजने ४ लग्न केली आहेत. तर एलेक्सनेदेखील एक लग्न केले आहे आणि घटस्फोट घेतला आहे. याशिवाय त्याचे नाव मेडोना, केट हडसन व कॅमरून डेजसोबत जोडलं गेलं आहे.


जेनिफरचे एलेक्ससोबत १९० कोटींचा करार झाला होता. या कराराअंतर्गत जेनिफरला एलेक्ससाठी १० वर्षांसाठी गाणे गायला लागणार होते आणि त्याचदरम्यान त्या दोघांमध्ये अफेयर सुरू झाले. जेनिफरने सांगितले होते की, एलेक्सने मला वॉशरूममध्ये मॅसेज करून प्रपोझ केला होता. त्याने लिहिले होते की, तू खूप सुंदर आहेस आणि तुझ्यासमोर मी ठीक ठाक दिसतो. पहिले रोमांस व मग डेटिंगनंतर त्यांनी २०१९मध्ये साखरपुडा केला.


जेलोच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या जेनिफरने पहिले लग्न १९९८ साली क्यूबाई वेटर ओजानी नोआसोबत केले होते. हे लग्न १ वर्षांनी तुटलं. त्यानंतर तिने २००१ साली डान्सर क्रिस जडसोबत लग्न केले आणि हे लग्न २००३मध्ये तुटले. २००४ साली गायक मार्क अँथोनीसोबत लग्न केेले आणि तिला या नवऱ्यापासून ११ वर्षांची जुळी मुले आहेत. २०१४ साली अँथोनीपासून ती विभक्त झाली आणि आता एलेक्ससोबत ती रिलेशनशीपमध्ये आहे.


असंही बोललं जातंय की दोघांनी मिळून १०० कोटींहून जास्त रुपये नवीन घरासाठी खर्च केले आहेत. हे घर ४००३ स्क्वेअर फूटचं आहे. जेनिफरची एकूण २८५४ कोटींची संपत्ती आहे. तर एलेक्सकडे २४९७ कोटींची मालमत्ता आहे. इतकंच नाही तर एलेक्स व जेनिफरला कारचेही क्रेझ आहे.

एलेक्सकडे बीएमडबल्यू, फरारी, रॉल्स रॉयस, पोर्शे या ब्रॅण्डच्या लक्झरी कार आहेत. कार व बोट्स व्यतिरिक्त एलेक्सकडे ११० कोटींहून जास्त किमतीची गल्फ स्ट्रीम नामक प्रायव्हेट जेट आहे.

इतकेच नाही तर एलेक्सने जेनिफरला जी अंगठी घातली त्याची किंमत ७ कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Jennifer Lopez Alex Rodriguez Plan To Be Married By Spring 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.