Inside the life of Cameron Ely, son of ‘Tarzan’ actor, accused of killing his mom | अभिनेत्याच्या मुलाने केली आईचीच हत्या, पोलिसांच्या गोळीबारात त्याचाही झाला मृत्यू
अभिनेत्याच्या मुलाने केली आईचीच हत्या, पोलिसांच्या गोळीबारात त्याचाही झाला मृत्यू

ठळक मुद्देकॅमरुनला त्याची आई म्हणजेच वॅलेरी लुंडिन ॲली यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून अनेकवेळा त्या दोघांची कडाक्याची भांडणं देखील झाली होती

टार्झन या प्रसिद्ध मालिकेमुळे हॉलिवूड अभिनेते रॉन ॲली यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या घरात एक अतिशय वाईट गोष्ट घडली असून यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या गोष्टीची हळहळ सगळेच व्यक्त करत आहेत. त्यांचा मुलगा कॅमरुन ॲलीने जन्मदात्या आईची हत्या केली असल्यामुळे या धक्कादायक गोष्टीची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

कॅमरुनला त्याची आई म्हणजेच वॅलेरी लुंडिन ॲली यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून अनेकवेळा त्या दोघांची कडाक्याची भांडणं देखील झाली होती. याच वादावरून त्या दोघांचे एकदा प्रचंड भांडण झाले होते. कॅमरुनचा राग अनावर झाल्याने त्याने आईची हत्या केली. त्याची आई ही 62 वर्षांची होती. हे सगळे घडले त्यावेळी रॉन स्वतः घरात उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला होता. पत्नीला वाचवायला गेलेले रॉन देखील या सगळ्यात जख्मी झाले. याचाच फायदा घेत कॅमरुन पळून गेला होता. 

कॅमरुनने चाकूने त्याच्या आईची हत्या केल्यानंतर तो फररा झाला होता. त्याला फरार आरोपी घोषित करण्यात आले होते. पोलिस त्याच्या मागावर होते. त्याचा सगळीकडे शोध सुरू असताना त्याचा पत्ता पोलिसांना कळला होता. पोलिस त्याला अटक करायला गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.  

English summary :
Hollywood actor Ron Ely was well-known for his famous series Tarzan. His son Cameron Alley kills his birth mother. Cameron ely killed his mother with a knife.


Web Title: Inside the life of Cameron Ely, son of ‘Tarzan’ actor, accused of killing his mom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.