'गेम ऑफ थ्रोन्स'ची स्टार मेसी विलियम्सने भलेही काही वर्षांत खूप लोकप्रियता मिळवली असली तरीदेखील तिला मानसिक पातळीवर देखील बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले होते. २०११ साली आर्या स्टार्कची भूमिका साकारून विलियम्स एका रात्रीत स्टार बनली होती. त्यावेळी ती फक्त १४ वर्षांची होती.


विलियम्सला सोशल मीडियावर यशासोबत टीका व ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला होता.

आजतकने दिलेल्या रिपोर्टनुसार एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, सोशल मीडियावरील निगेटिव्ह कमेंट्सला पूर्णपणे इग्नेर करणे खूपच कठीण होते. मात्र ती या कमेंट्सचा तिच्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी ती प्रयत्न करते.


मेसी विलियम्सने सांगितले की,'सोशल मीडियावर लोक काहीही लिहितात आणि त्यांना वाटते की वाईट कमेंटवर कोणीही लक्ष देणार नाही. पण, असे नाही. काही परिस्थितीमध्ये अशा कमेंट्स तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. सोशल मीडियामुळे ही गोष्ट नेहमी डोक्यात राहते की आपल्याबद्दल लोक काय विचार करतात? आणि या गोष्टींचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो.'


तिने हे ही सांगितले की' एक काळ असा होता ज्यावेळी दररोज मी स्वतःचा द्वेष करायची. जेव्हा मी माझ्या फ्रेंड्ससोबत बोलायचे तेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी वेगळे चालू असायचे. माझ्या मनात यायचे की मी स्वतःचा किती द्वेष करते. तो काळ माझ्यासाठी अजिबात सोप्पा नव्हता. '


विलियम्स सांगते की,  'तो काळच असा होता जेव्हा मी त्रस्त व दुःखी असण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. पण कसेतरी त्यातून बाहेर पडले. कधी कधी वाटते की पुन्हा मी त्या अंधाऱ्या गल्लीत हरवली तर जाणार नाही ना. मी खूप प्रयत्न करते की एक पॉजिटिव्ह विचार करू आणि स्वतःला जास्त चांगले बनवण्याचा प्रयत्न करीत राहू.'


Web Title: How to hate yourself once, the star of 'Game of Thrones'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.