ठळक मुद्दे एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत डॉलीने कौतुकाचा वर्षाव करणा-या सर्वांचे आभार मानले आहेत.
हॉलिवूडची डॉली पार्टन ही अभिनेत्री कोरोना लस शोधून काढणार, असा विचार कोणीही केला नव्हता. पण हे घडलयं. होय, डॉलीने प्रत्यक्षात लस शोधली नाही, पण या लसीसाठी घसघशीत 1 मिलियन अमेरिकन डॉलरची मदत दिली. भारतीय चलनात सांगायचे तर जवळपास 7 कोटी रूपये दिले. त्यामुळे एकार्थाने कोरोना लसीच्या निर्मितीत तिचाही मोठा वाटा आहे. सध्या या कारणासाठी डॉलीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.
आता ही डॉली पार्टन कोण तर हॉलिवूडची म्युझिक लेजेंड. 60 च्या दशकापासून आत्तापर्यंत डॉलीने हजारो गाणी गायली आहे. ती एक अभिनेत्रीही आहे. वयाच्या 10 व्या वर्षी डॉली पहिल्यांदा Cas Walker Farm and Home Hour शोमध्ये दिसली होती. हॉलिवूडच्या अनेक सिनेमातही तिने काम केलेय. याच डॉलीने मॉर्डना कंपनीच्या कोरोना लसीच्या संशोधनासाठी सात कोटी रुपयांची मदत दिली.
एप्रिल 2020 मध्ये आपल्या मित्राच्या सन्मानार्थ Vanderbilt University Medical Center ला मदत दिली होती. तिच्या या देणगीचा काही हिस्सा मॉडर्नाकडे गेला. हा पैसा मॉर्डनाने कोरोना लस संशोधनासाठी वापरला आणि काही महिन्यांत लस तयारही केली. मॉडर्नाची ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावशाली असल्याचे मानले जात आहे. आत्तापर्यंतच्या सर्वाधिक यशस्वी दोन लसींपैकी एक मॉडर्नाची लस आहे. येत्या वर्षाअखेरिस या लसीची विक्रीही सुरु होणार आहे.
ही लस बनवणा-या संशोधकांनी या यशाचे श्रेय डॉलीला दिले आहे. सोशल मीडियावरही डॉलीचे कौतुक होत आहे. कोरोना लस शोधण्यात डॉलीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही अधिक योगदान दिले, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. अनेकांनी यासाठी डॉलीला नोबेल देऊन गौरविण्याची मागणीही केली आहे.
आज मी खूप आनंदात आहे....
एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत डॉलीने कौतुकाचा वर्षाव करणा-या सर्वांचे आभार मानले आहेत. ‘आज मी खूप आनंदात आहे. कुठल्याही संशोधनासाठी संशोधकांना अर्थिक मदतीची गरज असते. मी कोणाची मदत करू शकले, याचे मला समाधान आहे. मी कोव्हिड फंडासाठी देणगी दिली तेव्हा फक्त काहीतरी चांगले काम करणे इतकीच माझी भावना होती. ते चांगले काम माझ्या हातून पार पडले, याचा आनंद आहे. जगभरातील लोकांना याचा लाभ मिळेल, अशी आशा करते, असे डॉली म्हणाली.
वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Hollywood actress Dolly Parton Helped Fund COVID Research
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.