हॅरी पॉटर फेम अभिनेत्री एमा वॉटसनचे एक वृत्त व्हायरल होताना दिसत आहे. हे वृत्त ऐकून तिचे चाहते नाराज झाले होते. असे वृत्त होते की ती अभिनयातून संन्यास घेणार आहे. आता तिने सिनेइंडस्ट्रीला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहते एमाला असे करू नको असे सांगत आहेत. या तर्कवितर्कामध्ये एमाच्या मॅनेजरचे महत्त्वपूर्ण विधान समोर आले आहे.


एमा वॉटसनच्या मॅनेजरने हे वृत्त फेटाळून लावले आहे. मॅनेजरने म्हटले की, एमा चित्रपटातून रिटायरमेंट घेणार नाही. एमा सोशल मीडियावर एक्टिव्ह नाही मात्र असे तिच्या करिअरसोबत होणार नाही. हे आधारहीन वृत्त उगाचच पसरवली जात आहे.


एका रिपोर्टमध्ये असा दावा केला होता की हॉलिवूड अभिनेत्री तिचा बॉयफ्रेंड लियो रॉबिनसनसोबतच्या नात्याला वेळ द्यायचा आहे. त्याच्यासोबत कौटुंबिक बंधनात अडकण्यासाठी ती अभिनय सोडू शकते. रिपोर्टमध्ये लिहिले होते की एमा अंडरग्राउंड गेली आहे आणि ती लियोसोबत घर बसवण्याच्या तयारीत आहे. कदाचित त्याच्यासोबत कुटुंब बनवण्यासाठी ती जास्त गंभीर आहे.


एमाच्या मॅनेजरचे विधान येण्यापूर्वीच चाहत्यांनी एमाला ट्रिब्युट द्यायला सुरूवात केली होती. इतकेच नाही तर ट्विटरवर तिचे नाव ट्रेंड करू लागले होते. एमा शेवटची २०१९मध्ये लिटिल वुमेनमध्ये दिसली होती. तिने चित्रपटात मेग मार्चची भूमिका केली होती.


एमा वॉटसनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती हॅरी पॉटर सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ८ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Harry Potter' fame Emma Watson retiring from acting ?, manager reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.