सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले असून आतापर्यंत अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यात आता कोरोना व्हायरसमुळे आणखीन एका कलाकाराचा बळी गेला आहे. प्रसिद्ध बेस गिटारिस्ट मॅथ्यू सिलिगमॅन यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांनी १९८५ मध्ये लाइव्ह ऍडमध्ये दिवंगत संगीत आयकन डेविड बोवी परफॉर्म केले होते.

मॅथ्यू सिलिगमॅन यांना १९८०च्या दशकात न्यू वेवच्या दृष्यात सेलिगमॅनच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. ते सॉफ्ट बॉइज आणि द थॉम्पसन ट्विन्सचे सदस्य होते. जे थॉमस डॉल्बीसोबत देखील काम करत होते.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, डॉल्बीने सेलिगमॅन यांच्या निधनाची बातमी दिली. 

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाच्या रुग्णाचा आकडा 2,407,699 हा असून देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे.

गेल्या 24 तासांत 1334 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 15712 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: Corona virus causes another victim to die TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.